तीन वर्षांत एड्सने घेतले ६०३ बळी
By admin | Published: April 10, 2017 09:34 PM2017-04-10T21:34:33+5:302017-04-10T21:34:33+5:30
एड्स आजाराचा विळखा वाढत चालला असून गेल्या तीन वर्षांत नागपूर जिल्ह्यात साडेतीन हजारांहून
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - एड्स आजाराचा विळखा वाढत चालला असून गेल्या तीन वर्षांत नागपूर जिल्ह्यात साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. यातील ६०३ एड्सग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला. एड्सबाबत व्यापक जनजागृतीची आवश्यकता असताना दुष्परिणामांच्या प्रचार-प्रसारावर अत्यल्प खर्च होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सकांकडे ह्यएड्सह्णबाबत माहिती विचारली होती. नागपूर जिल्ह्यात १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत किती ह्यएड्सह्णग्रस्त रुग्ण आढळले, किती रुग्णांचा मृत्यू झाला, या कालावधीत किती अनुदान प्राप्त झाले व ह्यएड्सह्ण नियंत्रण मोहिमेअंतर्गत प्रचार-प्रसारावर किती खर्च करण्यात आला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१४ ते २०१६ या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत ३ हजार ७३० ह्यएड्सह्णग्रस्त आढळून आले. यातील २ हजार ३४४ रुग्ण हे सामान्य रुग्णालयात आढळून आले तर १ हजार ३८६ रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत होते. एकूण ६०३ जणांचा मृत्यू झाला. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९५ रुग्णांचा समावेश आहे.
सामान्य रुग्णालय जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला तीन वर्षांच्या कालावधीत १७ लाख ११ हजार ४३० रुपयांचे शासकीय अनुदान प्राप्त झाले. यापैकी १२ लाख ८८ हजार ९९७ रुपयांचा निधी ह्यएड्सह्ण नियंत्रण कार्यक्रमात खर्च झाला. दरम्यान, जनजागृतीसाठी ९१ हजार ५०० रुपयांचा खर्च झाला. याचाच अर्थ प्रत्येक वर्षी सरासरी ३० हजार ५०० रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्याची व्याप्ती लक्षात घेता हे प्रमाण फारच कमी असून अशाने लोकांमध्ये जनजागृती कशी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भंडाऱ्यात चार तर गडचिरोलीत आठ मृत्यू
दरम्यान, भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ३१ ह्यएड्सह्णग्रस्त आढळले व यातील चार जणांचा मृत्यू झाला. तर याच कालावधीत गडचिरोली जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ३०४ रुग्णांना ह्यएड्सह्णची लागण झाली व आठ जणांचा मृत्यू झाला.