आॅइल कंपनीची ४८ लाखांची फसवणूक
By admin | Published: October 23, 2014 02:47 AM2014-10-23T02:47:58+5:302014-10-23T02:47:58+5:30
सोयबीन खरेदी करणा-या कंपनीची ४८ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका व्यापा-यासह कंपनीच्या गोडाऊन किपरला अटक करण्यात आली आहे.
धुळे : सोयबीन खरेदी करणा-या कंपनीची ४८ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका व्यापा-यासह कंपनीच्या गोडाऊन किपरला अटक करण्यात आली आहे.
औद्यगिक वसाहतीतील महाराष्ट्र आॅईल प्रा़ लि कंपनीची धुळे व नंदुरबार येथ शाखा आहे. कंपनी सोयाबीनची खरेदी करून त्याची चाचणी घेते. व्यापाऱ्यांनी पाठविलेल्या बियाण्याचे नमुने लॅबमध्ये चाचणीसाठी पाठविले जातात. लॅबमध्ये पाठविल्या जाणाऱ्या नमुन्यामध्ये फेरफार करण्यासाठी कंपनीचा गोडाऊन कीपर सुनील कासार हा व्यापाऱ्यांकडून प्रति ट्रक दोन ते सहा हजार रूपये घ्यायचा. ती रक्कम रोख किंवा कासारच्या बँक खात्यात जमा व्हायची.
कंपनीचे संचालक सुनिल मदनलाल अग्रवाल यांच्या हा लक्षात प्रकार आला़ गोडाऊन कीपरने व्यापाऱ्यांशी संगनमत करुन २००७ पासून कंपनीची फसवणूक करुन ४८ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान केल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात त्यांनी मोहाडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गोडाऊन कीपर सुनिल कासार , सोयाबीन व्यापारी त्रिलोक, महेंद्र भेरूलाल अग्रवाल (दोघेही रा़ ओझर, सेंधवा, मध्य प्रदेश) व दीपक कलाल (नंदुबार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)