Maharashtra Politics: MIM आणि वंचित बहुजन आघाडीची युती का तुटली? ओवेसी म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांनी...” 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 02:42 PM2023-01-05T14:42:44+5:302023-01-05T14:43:56+5:30

Maharashtra News: एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याचे सांगितले जात असून, ओवेसींनी यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

aimim asaduddin owaisi told about how and why aimim and vanchit bahujan aghadi alliance is broken | Maharashtra Politics: MIM आणि वंचित बहुजन आघाडीची युती का तुटली? ओवेसी म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांनी...” 

Maharashtra Politics: MIM आणि वंचित बहुजन आघाडीची युती का तुटली? ओवेसी म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांनी...” 

googlenewsNext

Maharashtra Politics: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाविकास आघाडीमध्ये येण्याचा मानस बोलून दाखवला होता. याबाबत सकारात्मक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही याबाबत कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.  उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे म्हणत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने (MIM) युती केली होती. ही युती अलीकडेच तुटल्याचे सांगितले जात आहे. यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया देताना ही युती का तुटली याबाबत स्पष्टच शब्दांत सांगितले. 

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या झालेल्या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांचा होता. त्यांच्या या निर्णयाचा कालही आदर करत होतो. आजही करतो अन् पुढेही करत राहील. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. पण आंबेडकर या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर काय बोलू शकतो? आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे. ते आता कसे सांगू? योग्य वेळी त्यावर बोलेल, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. 

भाजप सत्तेत आहे, तिथे हा असंविधानिक कायदा बनवण्यात आला

लव्ह जिहाद कायद्याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले की, भारताच्या संविधानानूसार आपल्या आवडीनुसार लग्न करू शकतात. जिथे जिथे भाजप सत्तेत आहे तिथे तिथे हा घटनाबाह्य कायदा बनवण्यात आला आहे. लव्ह जिहाद म्हणतात पण भाजपमध्ये असे किती लोक आहेत की त्यांनी अशी लग्न केली आहेत. कोणी प्रेम करतेय तर तुम्हाला त्रास काय? प्रत्येक प्रश्नाला जातीयवादी नजरेतून बघणे योग्य नाही. लव्ह जिहाद कायदा तुम्ही सिद्ध कसा करणार? अशी विचारणा ओवेसी यांनी केली. 

दरम्यान, आपल्याकडे बेरोजगारी, महागाई आणि इतर खूप मुद्दे आहेत, त्यावर बोला. तरुणांच्या हाताला काम द्या. नोकरीच्या संधी वाढवा. महागाई कमी करा. तुम्हाला फक्त नावाचे पडलेय. नामांतरापेक्षा कामाच्या गोष्टींवर बोला, अशी टीका ओवेसी यांनी भाजपवर केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: aimim asaduddin owaisi told about how and why aimim and vanchit bahujan aghadi alliance is broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.