“मनोज जरांगे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा नेता, राजकारणात यायचा विचार करावा”: इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 01:44 PM2023-12-27T13:44:33+5:302023-12-27T13:45:04+5:30

Imtiyaz Jaleel And Manoj Jarange Patil: विधानसभा, लोकसभेत आपल्या विचारांचे लोक पाठविणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे जलील यांनी म्हटले आहे.

aimim mp imtiaz jaleel said manoj jarange patil should come in politics for maratha reservation issue | “मनोज जरांगे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा नेता, राजकारणात यायचा विचार करावा”: इम्तियाज जलील

“मनोज जरांगे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा नेता, राजकारणात यायचा विचार करावा”: इम्तियाज जलील

Imtiyaz Jaleel And Manoj Jarange Patil: महाराष्ट्रात आजच्या घडीला सर्वांत मोठा नेता कोणता असेल तर मनोज जरांगे पाटील आहे. मनोज जरांगे यांची समाजासाठीची तळमळ, प्रामाणिकता पाहून समाज त्यांच्याकडे आकृष्ट झालेला आहेत. स्टंट करणाऱ्या नेत्यांना जनता लगेच ओळखते. पण मनोज जरांगे कोणताही स्टंट न करता समाजाचे प्रश्न सोडवण्यास पुढाकार घेत आहे. मराठा समाजाने जरांगे पाटील यांना आपला नेता मानले आहे. मनोज जरांगे यांनी राजकारणात यायचा विचार करावा, असे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. 

आपल्या विचारांचे लोक विधानसभा, लोकसभेत पाठविणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, हे माझ्या मुस्लीम समाजाला नेहमीच सांगत असतो. गल्लीत कायदे बनत नाहीत, त्यासाठी सभागृहातच जावे लागते. मनोज जरांगे यांनाही हाच सल्ला देईन. त्यांनी याचा विचार करावा. लोक टीका करतील, पण त्याचा विचार त्यांनी करू नये. कारण आरक्षणावर मार्ग काढायचा असेल तर ते विधानसभा आणि संसदेतूनच होईल. जरांगे पाटील यांनी कितीही तीव्र आंदोलन केले तरी निर्णय सरकारच घेणार आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांचा काहीही भरवसा नाही

मराठा समाजाचे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची भेट घेतली, तेव्हा ते कशाप्रकारे आश्वासन देत होते. आपण सर्वांनी पाहिले. पंतप्रधान मोदी यांचा काहीही भरवसा नाही, राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ते निवडणुका जाहीर करू शकतात. तेव्हा राज्य सरकार सांगेल की, आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे आरक्षण देता येणार नाही. अनेक समाजांना गेल्या कित्येक वर्षांपासून असेच मुर्खात काढण्यात आलेले आहे, या शब्दांत जलील यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, आमचा मार्ग राजकारण नाही. गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. आरक्षण मिळाले पाहिजे. ही पोरे मोठी झाली पाहिजे, असे आम्हाला वाटते. नेमका आमचा राजकारणानेच घात केलाय. जनचळवळीत इतकी ताकद आहे की ते आता सिद्ध झाले आहे. लोकांचा समज होता की, आंदोलनाने काही होत नाही. हा खूप मोठा गैरसमज होता. गरिबांचे कामच नाही की सामाजिक क्षेत्रात जाऊन चळवळ करणे. परंतु, याच आंदोलनामुळे ५६ लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. याचा अर्थ आंदोलनात ताकद आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी जलील यांच्या आवाहनावर दिली.

 

Web Title: aimim mp imtiaz jaleel said manoj jarange patil should come in politics for maratha reservation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.