ऐन दिवाळीत थंडी गायब; मुंबईचा पारा ३६ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 06:23 AM2020-11-16T06:23:19+5:302020-11-16T06:23:29+5:30
Temperature Increase : काेकणातही तापमानात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोव्हेंबर महिन्याची पहाट गुलाबी थंडीने उजाडली खरी; मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान २५ अंशांवर दाखल झाले आहे. तापमानातील वाढीमुळे ऐन दिवाळीत थंडी गायब झाल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, मुंबईचे कमाल तापमान ३६ अंशांवर आहे. गेल्या ४८ तासांपासून हवामानात हे बदल नोंदविण्यात आले आहेत. शिवाय पुढील ४८ तासांत तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल. कोकण विभागातही तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. हे तापमान ३२ अंशांच्या आसपास असेल.
मुंबईच्या किमान तापमानात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगली घसरण झाली होती. ते १९ अंशांच्या आसपास गेले हाेते. त्यामुळे गेला आठवडाभर मुंबईत थंडी होती. दिवाळीदरम्यान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार, तापमानात वाढ नोंदविण्यात आली.
मुंबईचे किमान तापमान
n१३ नोव्हेंबर : २३ अंश सेल्सिअस
n१४ नोव्हेंबर : २४ अंश सेल्सिअस
n१५ नोव्हेंबर : २५ अंश सेल्सिअस