तत्काळ उपचारासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्स

By Admin | Published: January 5, 2017 05:10 AM2017-01-05T05:10:40+5:302017-01-05T05:10:40+5:30

आगीच्या दुर्घटनेत अथवा कोणत्याही आपत्तीतील जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी, हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा

Air ambulance for immediate treatment | तत्काळ उपचारासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्स

तत्काळ उपचारासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्स

googlenewsNext

मुंबई : आगीच्या दुर्घटनेत अथवा कोणत्याही आपत्तीतील जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी, हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार सुरू आहे. दान केलेले अवयव तत्काळ इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठीही या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर होणार आहे.
यासाठी सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्याची सेवा आहे? याची
चाचपणी सुरू आहे. शहरातील अनेक जागांची यासंदर्भात पाहणी केली जात आहे. त्यानंतरच इच्छुक कंपन्यांना आवाहन करण्यात येणार आहे. अशा प्रकारची देशातील ही पहिली सेवा ठरेल.
महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथे केबलमध्ये अडकलेल्या पक्ष्याला वाचवताना अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले. मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहतूककोंडीमुळे या जवानांना ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात नेण्यास विलंब झाला. त्यामुळे राजेंद्र भोजने या जवानाला उपचार मिळण्यास विलंब झाल्याने, गेल्या आठवड्यात त्यांचा मृत्यू झाला. याआधीही अशाच दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टर सेवेची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीची दखल घेऊन ही योजना विचारात घेण्यात आली आहे.

जागांचा पर्याय
मुख्यत: ओव्हल मैदान, सागरी सेतूकडून वांद्रेच्या दिशेने असलेले मोकळे मैदान, तसेच वांद्रे-कुर्ला संकुल येथील मैदानाचा पर्याय चाचपण्यात येत आहे. त्याचबरोबर, रुग्णालयाच्या गच्चीवरील हेलिपॅडचाही उपयोग होऊ शकेल.

खर्च : आगाऊ बुकिंग केलेले हेलिकॉप्टर (हिव्टन इंजिन) एक, तासाचे सव्वा लाख रुपये, सिंगल इंजिनचे तासाला
80000


आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त आय. कुंदन यांनी हा आराखडा तयार केला आहे. मात्र, या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबत शंका
व्यक्त होत आहे.

आर्थिक पेच
ही सेवा विनामूल्य ठेवण्याचा विचार सुरू आहे. मात्र, अग्निशमन विभाग केवळ आपल्या जखमी जवानांचा खर्च उचलेल. सर्वसामान्य रुग्णांचा खर्च कोण देणार? असा पेच निर्माण झाला आहे.

Web Title: Air ambulance for immediate treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.