वातानुकूलित बेस्ट बसेस बंद! आर्थिक संकटातून सुटकेसाठी ‘बेस्ट’ मार्ग
By admin | Published: April 13, 2017 09:58 PM2017-04-13T21:58:31+5:302017-04-13T21:58:31+5:30
पांढरा हत्ती ठरलेल्या वातानुकूलित बसगाड्या अखेर बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. आर्थिक संकटातून सुटका करण्यासाठी बेस्ट हे पहिले पाऊल
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.13 - पांढरा हत्ती ठरलेल्या वातानुकूलित बसगाड्या अखेर बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. आर्थिक संकटातून सुटका करण्यासाठी बेस्ट हे पहिले पाऊल टाकले आहे, महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत वातानुकूलित बसेस सोमवारपासून बंद करण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने जाहीर केले.
बेस्ट उपक्रमावर सुमारे तीन हजार कोटींचे कर्ज आहे. तसेच वाहतूक विभागात ५९० कोटींची तूट असल्याने कर्मचाºयांना पगार देणेही बेस्टला अवघड झाले आहे. यामुळे बेस्टला टाळे लागण्याची वेळ आल्याने पालक संस्था म्हणून महापालिकेकडे बेस्टने मदत मागितली आहे. मात्र आर्थिक मदत हवी असल्यास आधी कृती आराखडा सादर करण्यास महापालिका प्रशासनाने सांगितले होते.
त्यानुसार महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत बेस्टने आराखडा सादर करीत तुटीत चालणारा वातानुकूलित बसमार्ग बंद करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. बेस्टचे पाचशे बसमार्ग आहे. एकदा अपवाद वगळता सर्वच बसमार्ग तुटीत आहेत. मात्र वातानुकूलित बसगाड्यांमुळे बेस्ट उपक्रमाला वार्षिक ३६० कोटींचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे बसमार्ग प्रथम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-बेस्टने २००६-२००७ मध्ये वातानुकूलित बसेस आणल्या. अशा २६६ बसगाड्या २५ बसमार्गांवर चालविण्यात येत आहेत.
-रस्त्यावरील खाजगी वैयक्तिक वाहनांची संख्या कमी करणे व उत्पन्न वाढविण्यासाठी वातानुकूलित बसगाड्या आणण्याचे उद्दिष्ट होते.
-मात्र या बसगाड्यांच्या तिकिटांतून मिळणाºया उत्पन्नाहून खर्च जास्त होता. त्यामुळे ही सेवा बेस्टसाठी पांढरा हत्ती ठरली.
-या बस सेवेतून वार्षिक ३६० कोटींचे नुकसान बेस्टला होत आहे. तरीही प्रतिष्ठेचा मुद्दा करीत हे बसमार्ग दहा वर्षे सुरू राहिले.
एसी बसमार्ग-२५
एसी बस संख्या-२६६
एसी बस पासधारक-२१६
प्रवाशी प्रतिदिन- १८ते २० हजार.
बेस्टच्या एकूण बसगाड्या ४१४३
वार्षिक तूट सुमारे ८०० कोटी
वातानुकूलित बसमार्गांची तूट वार्षिक ३६० कोटी