मुंबई विमानतळावर लँडिंगवेळी एअर इंडिया विमानाचा टायर फुटला

By admin | Published: October 18, 2016 12:14 PM2016-10-18T12:14:19+5:302016-10-18T12:14:59+5:30

एअर इंडिया विमानाचा लॅडिंगवेळी टायर फुटल्याची घटना मुंबई विमानतळावर घडली आहे. विमानात एकूण 128 प्रवासी आणि क्रू मेम्बर्स होते.

Air India aircraft tire fired at landing in Mumbai airport | मुंबई विमानतळावर लँडिंगवेळी एअर इंडिया विमानाचा टायर फुटला

मुंबई विमानतळावर लँडिंगवेळी एअर इंडिया विमानाचा टायर फुटला

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - एअर इंडिया विमानाचा लॅडिंगवेळी टायर फुटल्याची घटना मुंबई विमानतळावर घडली आहे. विमानात एकूण 128 प्रवासी आणि क्रू मेम्बर्स होते. एअर इंडियाचं AI 614 विमान अहमदाबादहून मुंबईला आले होते. सकाळी 9 वाजता मुंबई विमानतळावर लॅडिंग करत असतानाच विमानाचा टायर फुटला. मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत. 
सर्व प्रवासी सुखरुप असून पुढील प्रवासासाठी दुस-या विमानाची सोय करण्यात येत असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्यांनी दिली आहे. 
 

Web Title: Air India aircraft tire fired at landing in Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.