एअर इंडियाची नांदेड ते दिल्ली विमानसेवेचे टेक आॅफ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 01:09 AM2018-11-20T01:09:37+5:302018-11-20T01:09:55+5:30
नांदेडकरांना प्रतीक्षा असलेल्या नांदेड-दिल्ली विमानसेवेला सोमवारी प्रारंभ झाला़ एअर इंडियाने ही सुविधा सुरू केली असून १२२ आसनक्षमता असणाऱ्या विमानाने पहिल्या दिवशी ११४ प्रवाशांसह राजधानीकडे उड्डाण केले.
नांदेड : नांदेडकरांना प्रतीक्षा असलेल्या नांदेड-दिल्ली विमानसेवेला सोमवारी प्रारंभ झाला़ एअर इंडियाने ही सुविधा सुरू केली असून १२२ आसनक्षमता असणाऱ्या विमानाने पहिल्या दिवशी ११४ प्रवाशांसह राजधानीकडे उड्डाण केले.
उडान योजनेअंतर्गत यापूर्वी नांदेड-मुंबई, नांदेड-हैदराबाद, नांदेड-अमृतसर या विमानसेवा सुरू झाल्या आहेत़ नव्याने सुरू केलेल्या सर्वच मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़ सोमवारी नांदेडच्या श्री गुरूगोविंदसिंगजी विमानतळावर खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते पहिल्या दोन प्रवाशांना बोर्डिंग पास देऊ न विमानसेचा प्रारंभ करण्यात आला़
नांदेड विमानतळावर नाइट लँडिंगसह विविध सोयीसुविधा आहेत़ कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेल्या या विमानतळावर खासगी कंपनीने आपली सेवा बंद केल्याने काही वर्षांपूर्वी हे विमानतळ नावालाच उरले होते़ उडान योजनेतून या विमानतळाला पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत़ ट्रू जेट कंपनीने नांदेड-हैदराबाद ही विमानसेवा सुरू केली़ प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून नांदेड-मुंबई विमानसेवा सुरू केली़ या दोन्ही विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़
सध्या नांदेड-अमृतसर -नांदेड विमानसेवा शनिवार व रविवार असे दोन दिवस आहे़ त्यापाठोपाठ आता नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे़ सोमवार व गुरुवार असे दोन दिवस नांदेडहून अवघ्या पावणेदोन तासांत दिल्लीला जाता येणार आहे़
नांदेड ते दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात केंद्रीय मंक्षी सुरेश प्रभू यांचे सहकार्य आणि गुरूद्वारा बोर्डाचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.आहे़ लवकरच नांदेडहून पुणे, शिर्डी, नागपूर, चंदीगढ, तिरूपती या ठिकाणी विमासेवा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले़
पुढच्या पाच फेºयांची तिकिटे बुक
नांदेडहून आता राजधानी दिल्लीसह मुंबई, हैदराबाद व अमृतसरला विमानाने जाता येते़ दिल्ली व अमृतसर आठवड्यातून दोन दिवस तर मुंबई, हैदराबाद सेवा दररोज उपलब्ध आहेत. आठवड्यातून दोन वेळा होणाºया नांदेड ते दिल्ली विमानसेवेच्या पुढील पाच फेºयांमध्ये शंभरावर सीट बुक झालेल्या आहेत़