विमानात हवाई सुंदरीवर सेल्फीसाठी जबरदस्ती, प्रवाशाला अटक

By admin | Published: June 28, 2016 08:48 AM2016-06-28T08:48:28+5:302016-06-28T08:48:28+5:30

दमन-मुंबई विमान प्रवासात हवाई सुंदरीवर सेल्फीसाठी जबरदस्ती करणा-या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

For the air safari on the air forcefully forced, the man arrested for the passengers | विमानात हवाई सुंदरीवर सेल्फीसाठी जबरदस्ती, प्रवाशाला अटक

विमानात हवाई सुंदरीवर सेल्फीसाठी जबरदस्ती, प्रवाशाला अटक

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २८ - दमन-मुंबई विमान प्रवासात हवाई सुंदरीवर सेल्फीसाठी जबरदस्ती करणा-या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अबुबाकर (२९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जेट एअरवेजच्या विमानाने गुजरातमधील दमन येथून मुंबईला येत असताना अबुबाकरने हवाईसुंदरीच्या इच्छेविरुद्ध सेल्फी घेतली त्यानंतर प्रसाधनगृहात जाऊन धुम्रपान करुन नियमांचे उल्लंघ केले. 
 
विमानाने मुंबई विमानतळावर लँण्ड केल्यानंतर अबुबाकरला अटक करण्यात आली. हवाई सुंदरीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार विमानात असताना अबु बाकरने तिचा हात पकडला व 'चलो ना यार एक सेल्फी लेते हैं' असे म्हटले. मी आक्षेप घेऊनही संपूर्ण प्रवासात त्याची माझ्याबरोबर गैरवर्तणूक सुरु होती. अबुबाकरने सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिने सरळ नकार दिला व आपल्या आसनावर बसली. 
 
पण अबुबाकर तिथून हलला नाही. तो तिच्या मागेच उभा होता. जेव्हा हवाईसुंदरी आपल्या आसनावरुन उठली तेव्हा अबुबाकरने हद्दच केली. त्याने सरळ तिच्या दंडाला धरले व सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु लागला. हवाई सुंदरीने आरडाओरडा केल्यानंतर केबिन क्रू चे सदस्य तिथे आले व त्यांनी सुटका केली. कलम ३५४ आणि ३३६ अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तो न्यायालयिन कोठडीत आहे. 

Web Title: For the air safari on the air forcefully forced, the man arrested for the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.