विमानतळासमोर हवा महाराजांचा पुतळा
By admin | Published: July 6, 2014 01:38 AM2014-07-06T01:38:43+5:302014-07-06T01:38:43+5:30
प्रवेशद्वारासमोर शिवाजी महाराजांचा रायगडावरील मेघडंबरीसह सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारण्याची मनसेची ठरावाची सूचना पालिका महासभेत नुकतीच मंजूर करण्यात आली़
Next
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2च्या प्रवेशद्वारासमोर शिवाजी महाराजांचा रायगडावरील मेघडंबरीसह सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारण्याची मनसेची ठरावाची सूचना पालिका महासभेत नुकतीच मंजूर करण्यात आली़ मात्र विमानतळ बनविण्यापूर्वी महाराजांचा पुतळा हलविण्याविरोधात आंदोलन करणा:या शिवसेनेच्या थंड भूमिकेवर या वेळी सवाल उठवित मनसेने शिवसेनेला कोंडीत पकडल़े
मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांनी याबाबतची ठरावाची सूचना सभागृहापुढे मांडली होती़ स्वराज्य आणि उत्कृष्ट राज्य कारभारामुळे ‘जाणता राजा’ हे बिरूद त्यांच्या नावापुढे सहजपणो येत़े संपूर्ण भारतातच नव्हेतर विदेशामध्येही त्यांच्या कीर्तीचे पोवाडे गायले जातात़ मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराजांचे नाव देऊनही त्यांचा पुतळा त्या ठिकाणी नसावा, हा महाराष्ट्राचा अवमान आहे, अशी नाराजी जाधव यांनी सभागृहापुढे व्यक्त केली़
या विमानतळावरील टर्मिनल 2चे काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटनही झाल़े मात्र महाराजांचा पुतळा अजूनही अडगळीत असताना यावर शिवसेनेने अद्याप आवाज का उठविला नाही, असा सवाल मनसेने केला़ मात्र त्या ठिकाणी लवकरच महाराजांचा पुतळा बसविण्यात येत असल्याची सारवासारव महापौर सुनील प्रभू यांनी केली़ तसेच ही सूचना आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवून महापौरांनी वेळ मारून नेली़ (प्रतिनिधी)