मोदींच्या पत्राने सेवानिवृत्त सैनिकाला बळ : केंद्रीय विद्यालयात मिळाला मुलाला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 01:49 PM2019-07-05T13:49:09+5:302019-07-05T13:52:30+5:30
दीर्घकाळ वायुसेनेतील नोकरीच्या माध्यमातून देशसेवा केल्यानंतर आपल्या मुलाला केंद्रीय विद्यालयात चांगले शिक्षण मिळावे यासाठी एका माजी सैनिकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहिले.
राहुल शिंदे
पुणे: दीर्घकाळ वायुसेनेतील नोकरीच्या माध्यमातून देशसेवा केल्यानंतर आपल्या मुलाला केंद्रीय विद्यालयात चांगले शिक्षण मिळावे यासाठी एका माजी सैनिकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहिले. तब्बल एक महिनाभर प्रवेशासाठी धरपडणाऱ्या या सैनिकाच्या मुलाला अखेर लोहगाव येथील केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळाला आणि त्याने सुटकेचा निःश्वास टाकला.
उत्तर प्रदेश येथील इटावा शहरातील माजी सैनिक मनिष प्रकाश हे आपल्या मुलाला केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिलीत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. नियमानुसार प्रवेश अर्ज भरल्यानंतर शाळेच्या प्रवेश यादीत मुलाचा २१० वा कमांक होता.सेवानिवृत्त कर्मचारी असूनही प्रवेश मिळत नसल्यामुळे त्यांनी शाळेत चौकशी केली.त्यात प्रवेश अर्ज भरताना सेवा करताना किती ठिकाणी बदली झाली आहे,याचा उल्लेख करण्याचे राहून गेल्याचे समोर आले.परंतु,आपण केलेल्या चुकीची शिक्षा आपल्या मुलाला का ? प्रवेश मिळाला नाही तर केंद्रीय विद्यालयातील दर्जेदार शिक्षणापासून आपले मुलग वंचित राहील वंचित राहिल. त्यामुळे त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पोस्टाने पत्र पाठवले. त्यात माझ्याकडून अर्ज भरताना नजर चुकीने काही त्रुटी राहून गेल्या,असाही उल्लेख केला.
पंतप्रधान कार्यालयातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या या पत्राची दखल घेण्यात आली. तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवरही हे पत्र प्रसिध्द झाले. त्यावर शाळेकडून आणि विविध कार्यालयांकडून केलेल्या कार्यवाहीनंतर उत्तरे मनिष प्रकाश यांनी दिली. सुमारे महिनाभर यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर पटेल यांच्या मुलाला केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 मध्ये प्रवेश मिळाला.
केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळावा; यासाठी अनेक पालक धडपड करत असतात.खासदारकीच्या कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठीही प्रयत्न केले जातात. परंतु,अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे हताश होऊन पालक दुस-या शाळेत प्रवेश घेतात. मात्र मनिष प्रकाश यांनी न थांबता आपले प्रयत्न सुरूच ठेवले,अखेर त्यांच्या मुलाला केंद्रीय विद्यालय क्रमांक-2 मध्ये प्रवेश मिळाला.तसेच काही दिवसांनंतर केंद्रीय विद्यालय क्रमांक- 1 मध्ये सुध्दा प्रवेशासंदर्भात पत्रव्यवहार झाला. त्यांनी केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 चा प्रवेश रद्द करून आता केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 मध्ये आपल्या मुलाचा प्रवेश केला आहे.
-----------------------------------
सैन्यात कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या मुलांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळतो. मात्र, मी वीस वर्ष वायूसेनेत सेवा करून सेवानिवृत्त झालो.केंद्रीय महाविद्यालयातील प्रवेश अर्जात किती ठिकाणी माझी बदली झाली,याची माहिती भरण्याचे माज्याकडून चूकून राहून गेले. त्यामुळे मुलाच्या प्रवेशात अडचणी आल्या.त्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले.तसेच वेळोवेळी पोर्टलवर पाठपुरावा केला.काही दिवसांनी माज्या मुलाला केव्ही-2 मध्ये प्रवेश मिळाला.मात्र,पत्रव्यवहार केल्यामुळे हा प्रवेश मिळाला की इतर कोणत्या करणामुळे प्रवेश झाला.हे ठामपणे मला सांगता येत नाही.- मनिष प्रकाश,माजी सैनिक