विमानतळावर पोलिसांची मस्करी मॉडेलला पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 09:30 AM2017-03-04T09:30:50+5:302017-03-04T11:13:48+5:30

विमानतळावर पोलिसांसोबत मस्करी करण एका मॉडेलला चांगलंच महागात पडलं असून तिला अटक करण्यात आली

At the airport, the funeral of the police has fallen to the model | विमानतळावर पोलिसांची मस्करी मॉडेलला पडली महागात

विमानतळावर पोलिसांची मस्करी मॉडेलला पडली महागात

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - विमानतळावर पोलिसांसोबत मस्करी करण एका मॉडेलला चांगलंच महागात पडलं असून तिला अटक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल 2 वर या मॉडेलने सामानाची तपासणी सुरु असताना सुरक्षा जवानाला मस्करीत आपल्या मैत्रिणीच्या बॅगेत बॉम्ब असून ती व्यवस्थित तपासा असं सांगितलं होतं. यानंतर कारवाई करत या तरुणील अटक करण्यात आली. तिच्या या मस्करीचा मनस्ताप इतर प्रवाशांना सहन करावा लागला आणि विमानाने एक तास उशीरा उड्डाण केलं.
 
अशा प्रकारची जीवघेणी मस्करी करत इतर प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण केल्याहबद्दल आणि लोकांमध्ये भीती पसरवल्याबद्दल या तरुणीला तीन वर्षांचा कारावास होण्याची शक्यता आहे. कांचन ठाकूर असं या तरुणीचं नाव असून ती मॉडेल आहे. आपल्या तीन मैत्रिणींसोबत एअर इंडियाच्या विमानाने ती दिल्लीला जात होती. बोर्डिंग गेटमधून पुढे गेल्यानंतर जेव्हा तिच्या मैत्रीणीची वेळ आली तेव्हा तिने सुरक्षा जवानाला तिच्याकडे बॉम्ब असल्याचं सांगितलं. यानंतर गोंधळ माजला आणि सुरक्षा विभागाने सीआयएसएफ आणि विमानतळ अधिका-यांना बोलावून घेतलं. 
 
सीआयएसएफने कांचन ठाकूर आणि तिच्या मैत्रीणींचं सामान विमानातून खाली उतरवले आणि एअर इंडियाच्या विमानाला उड्डाणाची परवानगी दिली. मात्र आपण फक्त मस्करी करत असल्याचं सांगत ठाकूरने वाद घालण्यास सुरुवात केली. ठाकूर नव तिच्या मित्रांचे सामान विमानातून काढल्यानंतर विमान नियोजित वेळेपेक्षा एक तास उशीराने म्हजेच रात्री ९ ऐवजी 10 वाजता उडाले. त्या मॉडेलच्या मस्करीचा इतर प्रवाशांना मोठा फटका बसला.
 
सीआयएसएफ अधिकारी सामानाची तपासणी करत असतानाही कांचन ठाकूरचं वाद घालणं सुरुच होतं. यानंतर त्यांना सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मध्यरात्री त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करणं योग्य असून त्यांना धडा शिकवणं गरजेचं असल्याचे एअर इंडियानेही म्हटले.  
 

Web Title: At the airport, the funeral of the police has fallen to the model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.