विमानतळावर कडेकोट बंदोबस्त

By Admin | Published: January 6, 2015 01:04 AM2015-01-06T01:04:47+5:302015-01-06T01:04:47+5:30

विमान अपहरणाचा इशारा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिक कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

At the airport tight settlement | विमानतळावर कडेकोट बंदोबस्त

विमानतळावर कडेकोट बंदोबस्त

googlenewsNext

हाय अलर्ट : सशस्त्र जवानांची संख्या वाढवली
नागपूर : विमान अपहरणाचा इशारा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिक कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला(सीआयएसएफ)चे जवान तैनात असतात. परंतु सध्या या सशस्त्र जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. एखादा दहशतवादी हल्ला परतवून लावू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सीआयएसएफच्या क्यूआरटीचे कमांडो अत्याधुनिक शस्त्रांनी विमानतळावर सज्ज ठेवण्यात आले आहेत. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे. यासोबतच सिक्युरिटी होल्ड एरियात दोनदा तपासणी केली जात आहे. विमानतळाच्या सीमेवरील सर्व १७ वॉच टॉवरवरून बारीक लक्ष ठेवले जात आहे. तसेच विमानतळाच्या आतील भागात पेट्रोलिंगद्वारा नजर ठेवली जात आहे.
सीआयएसएफ चे दोन ‘डॉग स्क्वॉड’सुद्धा बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहेत. दोन स्निफर डॉगसुद्धा प्रवाशांच्या सामानांची तपासणी करीत आहे. टर्मिनल बिल्डिंगमधील लाऊंजसह ड्रॉप अ‍ॅण्ड गो झोन आणि पार्किंगमधील सामान व वाहनांची तपासणी डॉग स्क्वॉडद्वारा केली जात आहे. महिला प्रवाशांच्या तपासणीसाठी सीआयएसएफच्या महिला कमांडोंना तैनात करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘सिक्युरिटी पॅटर्न’मध्ये बदल
गेल्या काही दिवसांपासून हाय अलर्टसंबंधात निर्देश प्राप्त झाले आहेत. विमानतळाला पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षा पद्धतीत काही बदलसुद्धा करण्यात आले आहेत. परंतु ते सांगता येणार नाही. कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला प्र्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. कुठलेही वाहन किंवा वस्तू खूप वेळपासून बेवारस आढळून आल्यास तत्काळ अधिकाऱ्यांना सूचना द्या. एअरलाईन्सच्या स्टाफलासुद्धा यासंबंधात सांगण्यात आले आहे.
- सुधीर कुमार, कमांडंट - सीआयएसएफ नागपूर विमानतळ

Web Title: At the airport tight settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.