पुरंदरमध्ये विमानतळाचा छुपा सर्व्हे

By admin | Published: October 3, 2016 01:44 AM2016-10-03T01:44:21+5:302016-10-03T01:44:21+5:30

शनिवारी खानवडी गावच्या बालधोंडी माळावर एका पथकाने पाहणी केली.

The airport's hidden surveys in Purandar | पुरंदरमध्ये विमानतळाचा छुपा सर्व्हे

पुरंदरमध्ये विमानतळाचा छुपा सर्व्हे

Next


खळद : शनिवारी खानवडी गावच्या बालधोंडी माळावर एका पथकाने पाहणी केली. त्यांच्यासमवेत महसूल खात्यातील काही कर्मचारी होते. ही बातमी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी या भागाकडे धाव घेतली. मात्र ते येईपर्यंत हे पथक निघून गेले.
यामुळे परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. वाघापूर, राजेवाडी, पारगाव, मुंजवडी, खानवडी या गावांतील ग्रामस्थ सरकार विश्वासात घेत नसल्याने संताप व्यक्त करीत आहेत. आम्ही ग्रामसभा घेऊन विरोध नोंदवला असतानाही हे पथक सर्व्हे करतेच कसा? हा ग्रामस्थांवर अन्याय आहे, हुकूमशाहीचे राजकारण जर स्थानिक नेते करणार असतील, शासन दडपशाही करणार असेल तर खानवडीकर इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाहीत अशी भूमिका ग्रामपंचायत सदस्य रमेश बोरावके यांनी मांडली. अधिक तीव्र आंदोलन करून ग्रामस्थ, महिला, मुले, गुरेढोरांसह तहसील कचेरीवर मोर्चा काढू असे माजी सरपंच रामदास होले यांनी सांगितले. (वार्ताहर)
>ग्रामस्थांचे उपोषण
पारगाव मेमाणे येथील ग्रामस्थांनी रविवारी गांधी जयंतीच्या औचित्याने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यापुढील सर्व लढा हा बाधित गावांनी एकत्रित येऊन लढण्याचे ठरले. या वेळी एखतपूर-मुंजवडीकर ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समितीचे सदस्य दत्ता झुरंगे यांनी, आमच्या घरादारावर नांगर फिरवणारे निर्णय शासन का घेते असा संतप्त सवाल केला. ग्रामपंचायत सदस्या दक्षता मेमाणे यांनी आजपर्यंत पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली जमीन कोणी जर हिरावत असेल तर येथील महिला आता शांत बसणार नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रसंगी त्यांच्याही पुढे एक पाऊल पुढे राहात तीव्र लढा देणार असल्याचे सांगितले.
>ग्रामसभेत विरोध
विमानतळाला विरोध होऊ लागला आहे. वाघापूर वगळता इतर गावांतून गामसभा घेऊन विरोध करण्यात आला असून, विमानतळाला
इंचभरही जमीन देणार नसल्याचा या वेळी ठराव करण्यात आला आहे. जमीन आमच्या बापाची, नाही कोणाच्या बापाची, विमानतळ हाय हाय, अशा घोषणा देऊन राममंदिर सभागृह दणाणून गेला होता.

Web Title: The airport's hidden surveys in Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.