अजय मिसर यांची नाशिक जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती

By admin | Published: August 31, 2016 10:03 PM2016-08-31T22:03:01+5:302016-08-31T22:13:17+5:30

दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ अजय मिसर यांची राज्य शासनाने दोन वर्षांसाठी जिल्हा सरकारी वकीलपदी तर अ‍ॅड. विनयराज तळेकर

Ajay Egypt's appointment to Nashik district government lawyer | अजय मिसर यांची नाशिक जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती

अजय मिसर यांची नाशिक जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती

Next
>नाशिक : दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांची राज्य शासनाने दोन वर्षांसाठी जिल्हा सरकारी वकीलपदी तर अ‍ॅड. विनयराज तळेकर यांची अतिरिक्त सरकारी अभियोक्तापदी नियुक्ती केली आहे. राज्य शासनाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि़ ३१) काढले असून जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती झालेले अ‍ॅड. मिसर हे दहावे जिल्हा सरकारी वकील आहेत. 
निफाड तालुक्यातील पिंपळगाव (बसवंत) येथील मूळ रहिवासी असलेले अ‍ॅड. अजय मिसर हे १९९४ पासून जिल्हा न्यायालयात वकिली करतात़ त्यांचे आजोबा व वडीलही वकिली क्षेत्रातील असून काका पोलीस महासंचालक होते.  अ‍ॅड़ मिसर यांनी दाऊद इब्राहिम, अबु जुंदाल, छोटा राजन, मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट गोळीबार, इगतपुरी रेशन धान्य घोटाळा याबरोबरच दहशतवादविरोधी खटले चालविले आहेत.
राज्य शासनाने यावर्षी प्रथमच जिल्हा सरकारी वकिलांच्या साहाय्यासाठी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता हे नवीन पद निर्माण केले असून त्यावर अ‍ॅड. विनयराज तळेकर यांची नियुक्ती केली आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ राजेंद्र घुमरे यांच्याकडून अ‍ॅड. मिसर हे सूत्रे स्वीकारतील.

Web Title: Ajay Egypt's appointment to Nashik district government lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.