मुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता!

By admin | Published: April 27, 2015 04:01 AM2015-04-27T04:01:26+5:302015-04-27T04:19:05+5:30

मुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता यांची नियुक्ती होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले असून, ३० एप्रिलच्या दरम्यान या नियुक्तीची शक्यता आहे.

Ajay Mehta as Mumbai Municipal Commissioner | मुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता!

मुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता!

Next

अतुल कुलकर्णी, मुंबई
मुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता यांची नियुक्ती होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले असून, ३० एप्रिलच्या दरम्यान या नियुक्तीची शक्यता आहे. मेहता सध्या पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. मेहता व गृहनिर्माण विभागाचे सतीश गवई यांच्यापैकी कोणाची नियुक्ती होणार यावर सध्या जोरदार खलबते रंगली असली तरी मेहता यांच्यावर शिक्कामोर्तब होईल, असे समजते.
विद्यमान आयुक्त सिताराम कुंटे यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, मुंबईच्या शहर विकास आराखड्यावरुन शिवसेनेने कुंटे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचेही कारण त्यामागे असल्याचे बोलले जाते. मात्र, दोन वर्षांत येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे जॉनी जोसेफ यांच्यानंतर कुंटे हे दुसरे आयुक्त आहेत.
३० एप्रिल रोजी कुंटे यांना तीन वर्षे पूर्ण होतील. या पदासाठी गृहनिर्माण विभागाचे सहसचिव सतीश गवई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आणि परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी यांच्या नावाची देखील चर्चा मुख्यमंत्र्यांकडे झाल्याचे वृत्त आहे. मात्र, चटर्जी पुढच्या वर्षी निवृत्त होत आहेत. करीर आणि गवई यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. शिवाय ‘शिवसेनेशी खेटण्याची ताकद’ हा महत्त्वाचा निकष देखील मुख्यमंत्र्यांकडे चर्चेला आल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेची निवडणूक भाजपाला एकहाती लढवायची आहे. नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांचा निकाल लक्षात घेता शिवसेनेला मुंबईत वाढू देण्याची तयारी भाजपा नेत्याची नाही.
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना काही लोकप्रिय निर्णय घेऊ शकते. अशावेळी पक्षाला फायदा मिळवून देणारा आयुक्त भाजपला हवा आहे. या निकषावर मेहता यांना मुख्यमंत्र्यांनी पहिली पसंती दिली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नजीकचे म्हणूनही मेहता यांची ओळख आहे. गेली सहा वर्षे ते महावितरणचे महाव्यवस्थापक होते.

Web Title: Ajay Mehta as Mumbai Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.