"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:04 PM2024-09-24T16:04:00+5:302024-09-24T16:06:56+5:30

Ajit Pawar First Reaction on akshay shinde encounter : अक्षय शिंदेचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. 

Ajit Pawar first reaction on akshay Shinde encounter Earlier opposition were saying hang Akshay Shinde, now says why killed him | "आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले

"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले

Ajit Pawar Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेमुळे महायुती सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. अक्षय शिंदे प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले. 

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "अक्षय शिंदे हा एक विकृत मनोवृत्तीचा व्यक्ती होता. छोट्या मुलींवर त्याने इतके अत्याचार केले की, मी सांगू शकत नाही. त्याने केलेल्या अत्याचाराबद्दल त्या मुलींनी घरच्यांना सांगितले. तो खूप वाईट होता. त्यावेळी बदलापूरच्या लोकांनी ९ तास रेल्वे रोखून धरल्या होत्या. इतका राग लोकांमध्ये होता. त्याला पकडा आणि फाशी द्या, अशी मागणी केली जात होती."

आता विरोधक म्हणताहेत अक्षय शिंदेला का मारले? अजित पवारांना संताप

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "आम्ही त्या मुलींची वैद्यकीय चाचणी केली. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. या घटनेची चर्चा देशभरात झाली. त्यावेळी विरोधी पक्षातील नेते म्हणत होते की, राज्यात महिला सुरक्षित नाही. आता विरोधक बोलताहेत की त्याला का मारले? आधी म्हणत होते, अक्षय शिंदेला फाशी द्या. असं कसं चालेल?", अशा शब्दात अजित पवारांनी मविआ नेत्यांना सुनावले.

"आपल्या घरातील महिलांना कोण असुरक्षित ठेवेल? हे पूर्ण राज्य आमचे घर आहे. त्याला पकडण्यात आले. चौकशीसाठी त्याला पोलीस तुरूंगातून घेऊन जात होते", असे अजित पवार म्हणाले. 

मी या घटनेचे समर्थन करत नाहीये, चौकशी होणार -अजित पवार

"अजित पवार या घटनेबद्दल अधिक बोलताना म्हणाले, "आरोपीने जवळ बसलेल्या पोलिसाची रिव्हॉल्व्हर घेतली आणि तीन गोळ्या झाडल्या. एका पोलिसाला गोळी लागली. त्या विकृत माणसाने गोळ्या झाडल्यामुळे पोलिसांनी प्रत्युरात कारवाई केली. त्यात तो मारला गेला. या घटनेचे मी समर्थन करत नाहीये. याची चौकशी होईल. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचलले. लहान मुलींवर अत्याचार करताना त्याला लाज वाटली नाही", असेही अजित पवार म्हणाले.

Web Title: Ajit Pawar first reaction on akshay Shinde encounter Earlier opposition were saying hang Akshay Shinde, now says why killed him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.