अजित पवारांची आमदार संजयमामा शिंदेंनी वाढवली डोकेदुखी, विधानसभा निवडणुकीबद्दल घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 01:55 PM2024-10-08T13:55:20+5:302024-10-08T13:58:48+5:30

Maharashtra Elections 2024: महाराष्ट्रातील निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय नेते आपापला विजय सुरक्षित करताना दिसत आहे. आता संजयमामा शिंदे यांनी अजित पवारांची कटकट वाढवली आहे. 

Ajit Pawar's MLA Sanjaymama Shinde increased the headache, took a big decision about the maharashtra assembly elections | अजित पवारांची आमदार संजयमामा शिंदेंनी वाढवली डोकेदुखी, विधानसभा निवडणुकीबद्दल घेतला मोठा निर्णय

अजित पवारांची आमदार संजयमामा शिंदेंनी वाढवली डोकेदुखी, विधानसभा निवडणुकीबद्दल घेतला मोठा निर्णय

Sanjaymama Shinde: विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच अजित पवारांसमोर अनेक आव्हाने उभी राहताना दिसत आहे. एकीकडे फुटीनंतर सोबत आलेले नेते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाताना दिसत आहे. त्यात आता अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संजयमामा शिंदे यांनी सोमवारी (७ ऑक्टोबर) कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, धनराज शिंदेही उपस्थित होते. याच मेळाव्यात बोलताना संजयमामा शिंदे यांनी शरद पवारांच्या नावाचाही उल्लेख केला होता. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार संजयमामा शिंदे यांनी "आपण अपक्ष निवडणूक लढवणार आहे", असे जाहीर केले. करमाळ्यातून संजयमामा शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढतील, असे म्हटले जात होते. पण, त्यांनी वेगळा निर्णय घेतला. 

शरद पवार, अजित पवारांबद्दल संजयमामा शिंदे काय म्हणाले?

आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, "शरद पवार माझे श्रद्धास्थान आहेत. अजित पवार माझे नेते आहेत. मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे, माझ्या नेत्यानेच हे जाहीर केले आहेत. मी अपक्ष निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवणार आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे."

"अजित पवारांनी करमाळ्यात लाडकी बहीण कार्यक्रमात बोलताना संजयला मत द्या, असे म्हटले. पण त्यांनी कोणत्याही चिन्हाचा उल्लेख केला नाही. हे सर्व परवानगी घेऊनच केले आहे. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे", असे सांगत संजयमामा शिंदेंनी निर्णय जाहीर केला. 

Web Title: Ajit Pawar's MLA Sanjaymama Shinde increased the headache, took a big decision about the maharashtra assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.