अजनीत तरुणाची हत्या

By admin | Published: October 23, 2016 03:31 PM2016-10-23T15:31:55+5:302016-10-23T15:31:55+5:30

अजनीतील श्रीनगर परिसरात शनिवारी रात्री ११ ते ११.१५ च्या सुमारास एका तरुणाची भीषण हत्या झाली.

Ajneet killed the youth | अजनीत तरुणाची हत्या

अजनीत तरुणाची हत्या

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - अजनीतील श्रीनगर परिसरात शनिवारी रात्री ११ ते ११.१५ च्या सुमारास एका तरुणाची भीषण हत्या झाली. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अमित अंबादे असे मृताचे नाव असल्याचे पोलीस सांगतात.
नरेंद्रनगर चौकाजवळ श्रीनगर आहे. चौकापासून पुढे डाव्या गल्लीत एका मेसच्या जवळ रात्री ११. ते ११.१५ च्या सुमारास एका तरुणावर सशस्त्र हल्लेखोरांनी जोरदार हल्ला चढवला. त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी पळून गेले. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी बाहेर आली तेव्हा त्यांना अमित वेदनांनी तडफडत असल्याचे दिसले. त्यामुळे नागरिकांनी अजनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा अमितचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शी आणि आजूबाजूच्यांकडून माहिती घेतल्यानंतर पोलीस आरोपींच्या शोधासाठी धावपळ करू लागले. वृत्त लिहिस्तोवर मृतकाचे पूर्ण नाव, पत्ता, आरोपीचे नाव आणि याा हत्येचे कारण स्पष्ट झाले नव्हते.

बाप को मारा था ... ईसलिए !
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी हिंगणा एमआयडीसीकडूनच अमितचा पाठलाग करीत होते. ते दोन मोटरसायकलवर चार जण होते. त्यांनी आदित्य मेंशनजवळ दुचाकीला धडक मारून अमितला खाली पाडले आणि त्याच्यावर सपासप घाव घातले. काही जणांनी यावेळी आरोपींना हटकले. का मारत आहे, अशी विचारणा केली असता ह्यईसने बाप को मारा था.. ईसलिए !ह्य असे सांगून आरोपी पळून गेल्याचे समजते. आदित्य मेंशनजवळ असलेल्या सीसीटीव्हीत हा खून कैद झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

Web Title: Ajneet killed the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.