अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार; मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 09:49 PM2020-06-24T21:49:43+5:302020-06-24T21:56:26+5:30
सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
मुंबई : महाविकास आघाडीतील वादानंतर अखेर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळालेली नाही. संजय कुमार यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने अजोय मेहता यांच्यावर वेगळी जबाबदारी दिली आहे.
सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दरम्यान, अजोय मेहता यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची नावे चर्चेत होती. मात्र, संजय कुमार यांच्या नावाला पसंती मिळाली असून त्यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे
1984 च्या बॅच चे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविड च्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील.
आणखी बातम्या...
एसटी कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन मिळणार, संघटनेकडून विरोध
राज्य सरकार कोरोनाच्या लढाईत पूर्णपणे अपयशी ठरलं - प्रवीण दरेकर
"पंडित नेहरू नसते तर चीनचा प्रश्नच निर्माण झाला नसता", भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान
भारताचे मंत्रालय आणि कंपन्या चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर - रिपोर्ट
46 वर्षांनंतर पहिल्यांदाच PPF वरील व्याजदर होऊ शकतो 7 टक्क्यांपेक्षा कमी!
'मेड इन चायना' नको तर मग 'या' ब्रँडचे खरेदी करू शकता स्मार्टफोन