महारेराचा पदभार अजोय मेहता यांनी स्वीकारला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 03:11 AM2021-02-16T03:11:08+5:302021-02-16T03:11:39+5:30

Ajoy Mehta : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून यशस्वीरित्या काम केल्यानंतर मेहता यांची अलीकडेच महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Ajoy Mehta took over the reins of Maharashtra | महारेराचा पदभार अजोय मेहता यांनी स्वीकारला 

महारेराचा पदभार अजोय मेहता यांनी स्वीकारला 

Next

मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) अध्यक्ष म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मेहता यांना  मंत्रालयात पद व गोपनीयतेची शपथ दिली. 
यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, महारेराचे सदस्य तथा माजी 
अतिरिक्त मुख्य सचिव विजय सतबीर सिंग, महारेरा अपिलीय प्राधिकरणाचे सदस्य एस. एस. संधू, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास तसेच महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू व अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून यशस्वीरित्या काम केल्यानंतर मेहता यांची अलीकडेच महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Web Title: Ajoy Mehta took over the reins of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.