कुंभमेळ्यात संघर्षाचा ‘आखाडा’
By admin | Published: August 25, 2015 02:34 AM2015-08-25T02:34:12+5:302015-08-25T02:34:12+5:30
कुंभमेळ्यातील प्रथम शाही स्नान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना प्रमुख साधू-महंतांमध्ये मात्र संघर्षाचा आखाडा रंगला आहे. सोमवारी दिवसभर एकमेकांवर आरोप
नाशिक : कुंभमेळ्यातील प्रथम शाही स्नान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना प्रमुख साधू-महंतांमध्ये मात्र संघर्षाचा आखाडा रंगला आहे. सोमवारी दिवसभर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्याने या वादांनी आणखी गंभीर स्वरूप धारण केले असून, यामुळे प्रशासन मात्र प्रचंड तणावाखाली आले आहे.
दिगंबर अनी आखाड्याचा पंचरंगी ध्वज न फडकावल्याने या आखाड्याने सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता; या आखाड्याचे तीन खालसे मात्र सोहळा पूर्ण होईपर्यंत थांबून राहिले होते. त्यांच्या या कृतीमुळे दिगंबर अनी आखाड्याचा अपमान झाल्याचे सांगत रविवारी आखाड्याचे श्री महंत कृष्णदासजी महाराज, श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी आपल्या अंतर्गत खालशांची बैठक बोलावली होती. रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास यांचे अध्यक्षपदही अमान्य केले होते. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले.
अध्यक्षाविना...
महंत ग्यानदास यांचे समर्थन त्र्यंबकेश्वरमधील १० आखाड्यांनी यापूर्वीच काढले असून, आता दिगंबर अनी या मुख्य आखाड्यानेही हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे सध्या आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावर कोणीही नाही.