नागपूरच्या अखिलेशचा आयक्यू = आईनस्टाईन आयक्यू
By Admin | Published: July 5, 2016 04:07 PM2016-07-05T16:07:16+5:302016-07-05T17:16:26+5:30
विज्ञानाला नवी दिशा देणारे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टिफन हॉकिंग्ज यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही
जागतिक दर्जाच्या ह्यआयक्यूह्ण चाचणीत नागपूरकर विद्यार्थ्याची दिग्गजांशी बरोबरी : वय वर्षे अवघे ११
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ५ : विज्ञानाला नवी दिशा देणारे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टिफन हॉकिंग्ज यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही. भल्याभल्या संशोधकांना त्यांच्या पातळीवर येणे जमले नाही. परंतु नागपूरकर विद्यार्थ्याने ही कमाल करुन दाखविली आहे. त्याचा आयक्यू (इंटेलिजन्स कोशन्ट) हा आईन्स्टाईन व हॉकिंग्ज यांच्याइतकाच असल्याचे सिद्ध झाले आहे. अवघ्या ११ वर्षाच्या अखिलेश चांदोरकर याने ही किमया केली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील उच्चआयक्यू असलेल्या व्यक्तींची संस्था ह्यमेन्साह्णच्या चाचणीत त्याने या दोन्ही महान संशोधकांच्या ह्यआयक्यूह्णइतकेच गुण मिळविले आहेत. बौद्धिक क्षमतेत उजवे असणाऱ्या जगातील २ टक्के लोकांमध्ये त्याचा समावेश झाला आहे. आईनस्टाईन व हॉकिन्स या दोघांचाही ह्यआयक्यूह्ण १६० होता. अखिलेशचा ह्यआयक्यूह्णदेखील तितकाच आला आहे.
नागपूरातील जैन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असलेल्या अखिलेशचे प्राथमिक शिक्षण स्कॉटलंडला झाले. त्याचे वडील ऋत्विक व आई सोनाली यांनी लहानपणीच अखिलेशमधील बुद्धिमत्ता हेरली होती. मागील वर्षी जूनमध्ये सुट्यांसाठी ह्यस्कॉटलंडह्ण येथे गेला असता अखिलेशने ह्यमेन्साह्णची परीक्षा दिली व त्यात त्याला हे यश मिळाले.
काय आहे ह्यमेन्साह्ण चाचणी ?
मेन्सा सोसायटीची स्थापना आॅक्सफोर्ड येथे १९४६ साली करण्यात आली होती. आॅस्ट्रेलियन वंशाचे बॅ.रोलेन्ड बॅरिल व संशोधक लान्स वारे यांनी मिळून ही संस्था सुरू केली होती. या संस्थेत जगातील सर्वोत्तम ह्यआयक्यूह्ण असलेल्या २ टक्के लोकांनाच सदस्यत्व देण्यात येते.
मेन्सातर्फे घेण्यात येणारी चाचणी ह्यआयक्यूह्ण मोजण्यासाठी जगभरात मान्यताप्राप्त आहे. ही चाचणी देण्यासाठी किमान १० वर्षे वय असणे आवश्यक आहे. या चाचणीत वयस्क व्यक्तीला जास्तीत जास्त १६१ अंक दिले जातात, तर किशोरवयीन मुलांना १६२ अंक देण्यात येतात.