अकलूज जि़ प़ गट : सासू सुनेची लढत लक्षवेधी ठरणार

By admin | Published: February 16, 2017 06:29 PM2017-02-16T18:29:00+5:302017-02-16T18:29:00+5:30

अकलूज जि़ प़ गट : सासू सुनेची लढत लक्षवेधी ठरणार

Akluj Junk Group: The fight for the mother-in-law will be interesting | अकलूज जि़ प़ गट : सासू सुनेची लढत लक्षवेधी ठरणार

अकलूज जि़ प़ गट : सासू सुनेची लढत लक्षवेधी ठरणार

Next

अकलूज जि़ प़ गट : सासू सुनेची लढत लक्षवेधी ठरणार

राजीव लोहकरे - अकलूज :

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अकलूज जि़ प़ गटाने मोहिते-पाटील गटाचा झेंडा अखंडितपणे डामडौलाने फडकवित ठेवला आहे़ मात्र या गटात यावेळी प्रथमच मोहिते-पाटील घराण्यातील पद्मजादेवी मोहिते-पाटील या शिवसेनेकडून तर शीतलदेवी मोहिते-पाटील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित असल्याने सासू विरुध्द सून अशी होणारी रंगतदार लढत लक्षवेधी ठरत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचा अकलूज गट हा राजकीय राजधानी म्हणून ओळखला जातो. या गटात आजतागायत मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व राहिले आहे़ या गटातून लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील व फत्तेसिंह माने-पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जि़ प़ चे पक्षनेतेपद तर नामदेवराव गायकवाड यांनी समाज कल्याण व मुमताज पठाण यांनी महिला बालकल्याण समितीचे सभापती पद भूषविले आहे़
मोहिते-पाटील गटाचा बालेकिल्ला असलेला अकलूज जि़ प़ गट यावेळी जि़ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला़ त्यामुळे या गटातून शिवसेनेच्या पद्मजादेवी मोहिते-पाटील व राष्ट्रवादीच्या शीतलदेवी मोहिते-पाटील या मोहिते-पाटील घराण्यातील सासू व सून एकमेकींच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत़ त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पद्मजादेवी मोहिते-पाटील या यापूर्वी २००७ साली राष्ट्रीय काँग्रेसकडून यशवंतनगर जि़ प़ गटातून विजयी होऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्या झाल्या होत्या़
राष्ट्रवादीच्या उमेदवार शीतलदेवी मोहिते-पाटील या शिवरत्न फाऊंडेशन व डॉटर्स मॉम फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकारण करतात. त्यांचे पती धैर्यशील मोहिते-पाटील हे सध्याचे जि़ प़ अकलूज गटाचे सदस्य असून पक्षनेतेपदी कार्यरत आहेत़

Web Title: Akluj Junk Group: The fight for the mother-in-law will be interesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.