अकोला मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी
By Admin | Published: February 24, 2017 05:10 AM2017-02-24T05:10:18+5:302017-02-24T05:10:18+5:30
महापालिकेत पूर्ण बहुमत द्या, मी विकासाचा शब्द देतो, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला : महापालिकेत पूर्ण बहुमत द्या, मी विकासाचा शब्द देतो, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात प्रचारादरम्यान केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत, अकोलेकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पूर्ण बहुमताचे दान टाकले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकींमध्ये इतर पक्षांना हद्दपार करणाऱ्या मतदारांनी महापालिकेतही भाजपाकडे एकहाती सत्ता सोपविली आहे. हा विजय खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांच्या रणनीतीचा ठरला. महापालिकेच्या २०१२मधील निवडणुकीत केवळ १८ जागांवर समाधान मानावे लागलेल्या भाजपाने या वेळी तब्बल ४८ जागांवर झेप घेतली आहे. युती न करताही मिळालेले हे यश भाजपाचे स्वबळ अधोरेखित करणारे ठरले असून, युतीविना लढणारी सेना केवळ ७ जागांवर थांबली आहे. काँग्रेसलाही गेल्या वेळच्या तुलनेत ६ जागा कमी मिळाल्या असून, १२ जागा जिंकत काँग्रेस क्रमांक २चा पक्ष झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ५ तर भारिप-बहुजन महासंघाला ४ जागांवर समाधान मानावे लागले.
अकोला
पक्षजागा
भाजपा४८
शिवसेना०८
काँग्रेस१२
राष्ट्रवादी०६
इतर0६