अकोला - दिंडी मार्गावर उसळला अलोट जनसागर !

By admin | Published: August 9, 2016 06:02 PM2016-08-09T18:02:18+5:302016-08-09T18:02:18+5:30

विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. विदर्भ माउलीला निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळल्याने, दिंडी मार्गावर भाविकांचा

Akola - Dothi road on the Alot Jansagar! | अकोला - दिंडी मार्गावर उसळला अलोट जनसागर !

अकोला - दिंडी मार्गावर उसळला अलोट जनसागर !

Next
>खामगाव: श्रींच्या पालखीला रजतनगरीचा श्रध्देचा निरोप
 
खामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले.  विदर्भ माउलीला निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळल्याने, दिंडी मार्गावर भाविकांचा मळा फुलल्याचेच चित्र दिसून आले.
संत गजानन महाराजांच्या पालखीने ११ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केले होते. भगवान विठ्ठलाचे आषाढी एकादशीला दर्शन घेवून ही पालखी परतीच्या मार्गाला लागली. दरम्यान, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर श्रींची पालखी सोमवारी सकाळी  खामगावात पोहोचली. या ठिकाणी पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात आले. मुक्कामी असलेल्या पालखीतील वारकºयांना श्रध्देचा निरोपही देण्यात आला.  दरम्यान, मंगळवारी पहाटे ५ वाजता श्रींच्या पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली. तत्पूर्वीच खामगाव आणि परिसरातील हजारो नागरिक, भाविक शेगावकडे निघाले होते. खामगाव आणि परिसरच नव्हे तर, नांदुरा, मलकापूर, चिखली, उंद्री, सिंदखेड राजा, बुलडाणा येथील भाविक खामगावात दाखल झाले. आपली वाहने खामगावात ठेवून, अनेक भाविकांनी दिंडी मार्गावरून माउलींसोबत पायी वारी केली. यामध्ये दिंडी मार्गावर पहिला भाविक पहाटे ४.३२ मिनिटांनी निघाला. तर ६ जणांचा एक जत्था ४.४६ वाजता, त्यानंतर टप्प्याने भाविकांच्या गर्दीत वाढ झाली. सकाळी ५.३८ वाजेपर्यंत भाविकांच्या अलोट गर्दीमुळे दिंडी मार्गाला भक्तीच्या मळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. सकाळी ८.४२ वाजता भाविकांचे एक टोक शेगावात तर दुसरे टोक खामगावात होते. संत गजानन महाराजांची पालखी १०.३० वाजता जवाहर नवोदय विद्यालयाजवळ पोहोचली. या ठिकाणी असलेल्या उंच लोखंडी पुलावरून श्रींच्या पालखीसह वारकºयांवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. सर्वात शेवटचा भाविक दुपारी १.५५ वाजता शेगावात पोहोचला. दरम्यान, काहींनी आपल्या वडिलांच्या खांद्यावर तर काही बालकांनी चक्क आई-मावशीने केलेल्या चादरीच्या पाळण्यातून वारी केली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. खामगाव-शेगाव या राज्य मार्गावरील वाहतूक पहाटे ३ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद होती. दुपारी ३ वाजतानंतर शेगाव येथून खामगावसाठी वाहतूक सुरळीत झाली.
 
दिंडी मार्गावर गणगणात बोतेचा गजर!
शहरातील श्रीहरी लॉन्सच्यावतीने दिंडी मार्गावर संत गजानन महाराजांनी दिलेल्या ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा गजर करण्यासाठी १३ ठिकाणी ३१ फुटाचे टॉवर उभारण्यात आले. या टॉवरवरून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मंत्राचा गजर करण्यात आला. दिंडी मार्गावरून पायदळ वारी करणाºया भाविकांसाठी महाराजा मसाला उद्योगाच्यावतीने ठिकठिकाणी अस्थायी स्वरूपाचे २४ मुत्री घर उभारण्यात आले. यामध्ये महिलांसाठी १६ तर  पुरूषांसाठी ८ मुत्री घरांचा समावेश होता. त्याचप्रमाणे संपूर्ण दिंडी मार्गावर विविध सामाजिक संस्था आणि मंडळांच्यावतीने भाविक, वारकºयांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. आबाल वृध्दांची लक्षणीय गर्दी मंगळवारी दिंडी मार्गावरून दिसून आली.
 
गर्दीचा उच्चांक!
श्रींची पालखी शेगावकडे मार्गस्थ झाल्यानंतर खामगाव येथून शेगावकडे जाणाºया भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारीही वाढत्या गर्दीच्या उच्चांकाचा प्रत्यय अनेक भाविकांना आला. गेल्या काही वर्षांपासून भाविकांच्या संख्येत सारखी भर पडत असल्यामुळे दिंडी मार्गही अरुंद जाणवतो. परिणामी अनेक भाविकांना गर्दीचा त्रास होतो. पालखीसोबत चालत असताना, वाट काढणेही कठीण होवून जाते. गर्दीमुळे काही भाविक दिंडीमार्गाच्या समातंर असलेल्या शेतातील पाऊल वाटेने संतनगरीत दाखल झाले.

Web Title: Akola - Dothi road on the Alot Jansagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.