अकोला शहरात २३ तृतीयपंथी मतदारांची नोंद

By Admin | Published: January 28, 2017 01:53 AM2017-01-28T01:53:53+5:302017-01-28T01:56:20+5:30

शहरात ४ लाख ७७ हजार ४५ मतदार नोंदणी झाली.

Akola has 23 registered voters in the city | अकोला शहरात २३ तृतीयपंथी मतदारांची नोंद

अकोला शहरात २३ तृतीयपंथी मतदारांची नोंद

googlenewsNext

अकोला, दि. २७-अकोला महापालिकेच्या २0 प्रभागातील ८0 नगरसेवकांच्या निवडीसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून ४ लाख ७७ हजार ४५ मतदार नोंदणी झाली आहे. मतदार संख्येच्या तुलनेत सर्वात मोठा प्रभाग म्हणून ९ आणि सर्वात लहान प्रभाग म्हणून ८ ची नोंद महापालिकेने केली आहे.
अकोला महापालिकेतील पावणे पाच लाख मतदाते चार उमेदवारांना मतदान करणार असल्याने जवळपास १९ लाख मतदान होणार आहे. अंतिम मतदार यादीनुसार २ लाख ४६ हजार १४४ पुरूष मतदार आहेत, तर २ लाख ३0 हजार ८७८ महिला मतदार आहेत. उर्वरित २३ मतदार हे तृतीयपंथी आहेत. एकूण २0 प्रभागांपैकी ११ प्रभागात तृतीयपंथी मतदार असल्याची नोंद महापालिकेने घेतली आहे. अकोला महापालिकेत जवळपास २४ गावांचा समावेश झाला असून, शहरालगत असलेल्या प्रभागात ग्रामीण मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे. शंभर टक्के मतदान होण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे ७0 टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वाधिक मतदारांचा प्रभाग असलेल्या ९ मध्ये २९ हजार ६५६ मतदार आहेत. सर्वाधिक पुरुष असलेला प्रभागही नऊच असून, येथे १५ हजार ४४४ पुरुष मतदार आहेत. सर्वाधिक स्त्रीयांचा मतदार म्हणून प्रभाग १0 ची नोंद होते. या प्रभागात १४ हजार २५0 मतदार आहेत. सर्वात कमी मतदार असलेला प्रभाग म्हणून ८ चा उल्लेख आहे. या प्रभागात १६ हजार २९६ मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्वाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने जनजागृती केली जात आहे; मात्र राजकीय पक्षाची मंडळी मतदानाच्या टक्केवारीपेक्षा आपल्या पदरातील मतदान कोणते, यावर डोळा ठेवून रणनीती आखत आहे.

Web Title: Akola has 23 registered voters in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.