अकोला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत शनिवारी

By admin | Published: August 13, 2014 08:42 PM2014-08-13T20:42:49+5:302014-08-13T20:54:58+5:30

अकोला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या १६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

Akola Mayor's Resignation Resignation Saturday | अकोला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत शनिवारी

अकोला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत शनिवारी

Next

अकोला : महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या १६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या सोडतीला मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी हजर राहण्याचे पत्रवजा निर्देश बुधवारी प्रशासनाला प्राप्त झाले. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या महापौरपदाचे आरक्षण नेमके काय निघते, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१२ मध्ये पार पडली होती. तत्पूर्वी आरक्षणाच्या सोडतीदरम्यान महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव निघाल्याने काँग्रेसप्रणीत महाआघाडीच्यावतीने महापौरपदी ज्योत्स्ना गवई यांना विराजमान करण्यात आले. महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांसाठी असून, येत्या सप्टेंबर महिन्यात हा कालावधी संपुष्टात येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने त्यापूर्वी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत निघण्याचे संकेत होते. त्यापृष्ठभूमिवर १३ ऑगस्ट रोजी मनपाला शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार येत्या १६ ऑगस्ट रोजी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात आरक्षण सोडत काढल्या जाईल. याकरिता मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

*आरक्षणावरील संभ्रम कायम
महापौरपदाच्या आरक्षणासाठी शासनाने २०११ मधील जनगणनेची आकडेवारी गृहीत धरल्यास आरक्षण सोडतीला नव्याने प्रारंभ केल्या जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आरक्षणाला खुल्या प्रवर्गापासून सुरुवात होईल. यापूर्वी महापौरपदासाठी साखळी पद्धतीने (रोटेशन) सर्वप्रथम ओबीसी प्रवर्गातील महिला, त्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिला, ओबीसी प्रवर्गातील पुरुष व २०१२ मध्येअनुसूचीत जाती (एससी प्रवर्ग) प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी सोडत निघाली. यापुढील अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती पुरुष किंवा अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग) महिला उमेदवाराचे आरक्षण निघण्याची शक्यता आहे. एकूणच, आरक्षणाची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येईल.

Web Title: Akola Mayor's Resignation Resignation Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.