अकोला ‘जीएमसी’मधील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर!
By Admin | Published: March 20, 2017 07:27 PM2017-03-20T19:27:19+5:302017-03-20T19:27:19+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील ‘मार्ड’ संघटनेशी संलग्नित असलेल्या १६ पीजी निवासी डॉक्टरांनी सोमवारी एकदिवसीय सामूहिक रजा घेतली.
डॉक्टरांना मारहाणीच्या घटनांचा निषेध : रुग्णसेवेवर परिणाम नाही अकोला : वैद्यकीय डॉक्टरांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटनांचा निषेध करण्यासाठी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलनाचे हत्यार उचलले आहे. या आंदोलनास प्रतिसाद देत अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील ह्यमार्डह्ण संघटनेशी संलग्नित असलेल्या १६ पीजी निवासी डॉक्टरांनी सोमवारी एकदिवसीय सामूहिक रजा घेतली. याबाबतचे निवेदन या डॉक्टरांनी उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांना सोपविले. दरम्यान, डॉक्टरांच्या या सामूहिक रजेचा कोणताही परिणाम रुग्णसेवेवर दिसून आला नाही. राज्यात धुळे, नाशिक व सायन येथील वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच असल्याने या घटनांचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील शासकीय आणि महापालिका रुग्णालयांतील ४,५00 निवासी डॉक्टरांनी रविवारपासूनच सामूहिक रजेवर जाण्याचे आंदोलन सुरू केले आहे. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ह्यमार्डह्ण ने आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेच्या हाकेस प्रतिसाद म्हणून अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील १६ पीजी निवासी डॉक्टरांनी रविवारी सामूहिक रजा टाकली. येथे मार्ड संघटनेशी संलग्नित असलेले केवळ १६ पीजी डॉक्टर आहेत, तर गैरपदव्युत्तर (नॉन पीजी)कनिष्ठ निवासी डॉक्टरांची एकूण संख्या ७५ आहे, तसेच वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संख्या ३४ आहे. पीजी डॉक्टरांनी एक दिवसीय रजा घेतली असली, तरी त्याचा कोणताही परिणाम रुग्णसेवेवर दिसून आला नाही. कनिष्ठ निवासी डॉक्टर रुग्णसेवेत असल्यामुळे दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम पडला नाही. सवरेपचार रुग्णालयातील सर्वच वार्डांमध्ये कनिष्ठ डॉक्टर रुग्णसेवा करताना दिसून आले. दरम्यान, सामूहिक रजेवर गेलेले १६ निवासी डॉक्टर उद्यापासून रुग्णसेवेत रुजू होणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी) वैद्यकीय महाविद्यालयातील १६ पीजी निवासी डॉक्टरांनी एक दिवसीय सामूहिक रजा टाकली आहे. त्याबाबतचे निवेदन या डॉक्टरांनी त्यांच्या स्वाक्षरीनिशी सोपविले आहे. कनिष्ठ निवासी डॉक्टर कार्यरत असल्यामुळे रुग्णसेवा बाधित झालेली नाही. - डॉ. कुसुमाकर घोरपडे, उप-अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.