अकोला - सोयबीन पीक पडले पिवळे
By admin | Published: August 30, 2016 02:35 PM2016-08-30T14:35:26+5:302016-08-30T14:35:26+5:30
पाण्याचा ताण पडल्याने पिके करपत असून, सोयाबीन पिवळे पडल्याने राज्यातील शेतक-यांच्या हरित स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
पिके परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पावसाने मारली प्रदिर्घ दडी
अकोला, दि. 30 - खरीप हंगामातील पीके परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाच पावसाने प्रदिर्घ दडी मारली. पाण्याचा ताण पडल्याने पिके करपत असून, सोयाबीन पिवळे पडल्याने राज्यातील शेतक-यांच्या हरित स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने पेरण्यांना हा पाऊस पोषक ठरला. जूलै-ऑगस्ट महिन्यातच पावसाने जवळपास सरासरी गाठली. पिकांची वाढही जोमदार झाली पण पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आली असतानाच पावसाने प्रदिर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवर दुष्परिणाम होत असून, सोयाबीनचे पीक अनेक ठिकाणी पिवळी पडली आहे.
पश्चिम विदर्भातील ३२ लाख हेक्टरपैकी साडे चौदा लाख हेक्टरवर यावर्षी सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे पीक ७० टक्के शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. ज्या शेतक-यांनी १० जुलैनंतर पेरणी केली तेथे हे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. शेंगा धरण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली आहे. परिणामी, सोयाबीनच्या दाण्याचा आकार कमी राहण्याची शक्यता आहे. हलक्या जमिनीतील सोयाबीनवर अधिक परिणाम होऊ शकतो, तर भारी, काळ्या जमिनीतील शेंगांवर या तुलनेत कमी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.मागील तीन,चार वर्षानंतर यावर्षी सोयाबीन पीक जोमदार वाढल्याने शेतकरी आंनदीत आहे.पण पाऊस त्यांच्या आनंदावर विरजण टाकतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या मूग, उडीद काढणीला सुरुवात झाली आहे; पण पाऊसच नसल्याने मुरमाळ व हलक्या जमिनीतील मुगाच्या शेंगांमधील दाणे अपरिपक्व आहे. यावर्षी शेतक-यांनी धाडस करू न या पिकांची पेरणी केली; पण सुरुवातीला आशेचा किरण दाखवणाºया पावसाने शेतकºयांना निराश केले आहे.
मान्सूनपूर्व बीटी कापसाने बोंड्या धरल्या असून, इतरही बीटी कापसाला फुले आली आहेत. यावर्षी कापसाचे पीक उत्तम असल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत; पण पाण्याचा ताण सहन करण्यापलीकडे या पिकाची क्षमता संपली आहे. शेतकºयांना आता पाऊस हवा असल्याने शेतकºयांचे डोळे पुन्हा नभाकडे लागले आहेत.ज्वारी पीक सध्यातरी ताण सहन करू न या अवस्थेत आहे. तूर हे आंतरपीक आहे; पण याही पिकाला पाण्याची गरज आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरीलही सोयाबीन पिवळे पडले आहे.