देशपातळीवरील स्पर्धेत अकोल्यातील विद्यार्थिनींनी बनविलेला ‘रोबोट’ ठरला अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 02:48 PM2020-01-20T14:48:44+5:302020-01-20T16:27:09+5:30
देशपातळीवरील स्पर्धेत चकमलेल्या या विद्यार्थीनी आता अमेरीकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
अकोला : मुंबई लिगो एज्युकेशन आॅर्गनायझेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या देशपातळीवरील ‘फर्स्ट लिगो लीग’ स्पर्धेत अकोल्यातील मनूताई कन्या शाळेच्या इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थिनींनी बनविलेला दैनंदिन समस्यांचे निराकरण करणारा ‘रोबोट’ ला पहिला क्रमांक मिळविला आहे. देशपातळीवरील स्पर्धेत चकमलेल्या या विद्यार्थीनी आता अमेरीकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
मुंबई लिगो एज्युकेशन ही आॅर्गनायझेशन दरवर्षी फर्स्ट लिगो लीगचे आयोजन करीत असते. या लीगमध्ये यंदा शहरातील समस्या आणि त्याचे निराकरण हा विषय घेतला असून, ही स्पर्धा १८ व १९ जानेवारी रोजी मुंबईत पार पडली. या लीगमध्ये मनूताई कन्या शाळेतील १४ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यासाठी लिगो एज्युकेशन आॅर्गनायझेशनने विद्यार्थिनींना रोबोट बनविण्यासाठी साहित्य पुरविले. या विद्यार्थिनींना किट्सच्या संचालक व रोबोटिक्सच्या तज्ज्ञ काजल राजवैद्य, शिक्षक विजय भट्टड यांनी तसेच त्यांच्या सामाजिक बांधीलकी विभागानेसुद्धा मार्गदर्शन व मदत केली. या विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पकतेने छोट्या पाटर््सचा वापर करून रोबोट तयार केला असून, त्याचे डिझाइन, प्रोग्रॅमिंग स्वत: तयार केले आहे.एकही दिवस सुटी न घेता, या विद्यार्थिनींनी रोबोटची निर्मिती केली. रोबोट बनविणाºया या विद्यार्थिनी मराठी माध्यमात शिकत असून, त्यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. शहरालगतच्या छोट्या गावांमधून येणाºया विद्यार्थिनींकडे आॅटोरिक्षाने शाळेत यायलासुद्धा पैसे नसतात. बºयाचदा या विद्यार्थिनी शाळेत पायी येतात. रोबोटच्या उपयोगिता सांगण्यासाठी विद्यार्थिनींनी अत्यंत मेहनत घेतली असून, इंग्रजीमध्ये त्यांनी छान मांडणी केली आहे. या विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाठक यांचेही मार्गदर्शन लाभले.
काय काम करतो ‘रोबोट’!
विद्यार्थिनींनी बनविलेला रोबोट ट्रॅफिक जाम, नैसर्गिक आपत्ती, संकटात सापडलेल्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम करतो. यासोबतच झाडांवर ट्री हाउस तयार करण्याचे काम करतो. क्रेन चालविण्यासाठी, बांधकाम साहित्य, मटेरियल्स पोहोचविण्यासाठीसुद्धा रोबोटची मदत होते. याशिवाय हा रोबोट उंचीवरसुद्धा चढू शकतो.
या विद्यार्थिनींनी बनविला ‘रोबोट’!
शहरातील ११0 वर्षे जुन्या मनूताई कन्या शाळेत शिकणाºया रुचिका मुंडाले, निकिता वसतकार, स्नेहल गवई, अर्पिता लंगोटे, सानिका काळे, गौरी झामरे, आंचल दाभाडे, पूजा फुरसुले, सायली वाकोडे, अंकिता वजिरे, समीक्षा गायकवाड, प्रांजली सदांशिव, गायत्री तावरे, प्रणाली इंगळे यांनी सांघिक भावनेतून हा रोबोट बनविला आहे.