राज्यात अकोला सर्वाधिक ‘हॉट’

By admin | Published: April 21, 2016 02:32 AM2016-04-21T02:32:32+5:302016-04-21T02:32:32+5:30

पारा ४५ अंश सेल्सिअसवर

Akola tops most 'hot' | राज्यात अकोला सर्वाधिक ‘हॉट’

राज्यात अकोला सर्वाधिक ‘हॉट’

Next

अकोला : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात बुधवारी सरासरी तापमानात लक्षणीय वाढ नोंदविल्या गेली. राज्यातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमान अकोला येथे नोंदविल्या गेले. येत्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असले, तरी तापमान कायम राहण्याची शक्यता पुणे येथील वेदशाळेने वर्तविली आहे. गत काही दिवसांपासून अकोला येथील तापमान वाढतच आहे. पारा ४४ अंश सेल्सिअसपुढे गेला असून बुधवार, २0 मार्च रोजी तर ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले. हा संपूर्ण आठवडा तापमान वाढीचा ठरला आहे. शनिवारपासूनच तापमान सातत्याने ४४ अंश सेल्सिअसवर नोंदविल्या गेले. मंगळवारी पारा ४४.७ अंश सेल्सिअसवर होता. बुधवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला येथे नोंदविल्या गेले. त्यापाठोपाठ वर्धा येथे ४४.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले. पश्‍चिम विदर्भात वाशिम येथे ४१.६, बुलडाणा येथे ४१.५, यवतमाळ येथे ४३.५ आणि अमरावती येथे ४३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले.

Web Title: Akola tops most 'hot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.