अकोल्यात मतदानाला शांततेत सुरवात !

By admin | Published: February 21, 2017 11:14 AM2017-02-21T11:14:30+5:302017-02-21T11:15:01+5:30

महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेला आज सकाळी ७.३० वाजता सुरूवात झाली आहे. जिल्हा उद्योग केंद्र प्रभाग ११ मधील मतदान यंत्र काहीवेळ बंद पडल्याने येथे उशिरा मतदानास सुरूवात झाली

Akola voting started peacefully! | अकोल्यात मतदानाला शांततेत सुरवात !

अकोल्यात मतदानाला शांततेत सुरवात !

Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २१ -  महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेला आज सकाळी ७.३० वाजता सुरूवात झाली आहे. जिल्हा उद्योग केंद्र प्रभाग ११ मधील मतदान यंत्र काहीवेळ बंद पडल्याने येथे उशिरा मतदानास सुरूवात झाली. जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महाराष्ट्र  कन्या शाळा मतदान केंद्र क्रमांक २० येथे मतदानाचा हक्क बजावला. माजी खासदार अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील जिल्हा परिषद शाळा मतदान क्रमाक १४ येथे मतदान केले.
अकोला महानगरपालिका क्षेत्रात प्रथमच लगतच्या २४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावातील नागरिक यावेळी प्रथमच महापालिकेसाठी मतदान करीत आहेत. त्या ठिकाणी मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. नागरिकांनी मतदान करण्यासाठी सामाजिक संघटना,युवक चौका,चौकात हातात कापडी फलक घेऊन मतदार करण्यासाठी नागरिकांचे  प्रबोधन करीत आहेत.या निवडणुकीत तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, २०० मिटरच्या आत मतदार,ओळखपत्र असलेले  उमेदवारांचे प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिदिला जात आहे. नेहमीप्रमाणे मतदारांना घेऊन येणारी वाहने यावेळी दिसली नाहीत.

Web Title: Akola voting started peacefully!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.