अकोल्याच्या शेतकरी गटाचे ‘मॉडेल’ झारखंड राज्यात!

By admin | Published: September 19, 2014 02:18 AM2014-09-19T02:18:40+5:302014-09-19T02:20:23+5:30

नेदरलँडच्या इको संस्थेचा सल्ला, ‘जेएसएलपीएस’ करणार अंमलबजावणी.

Akola's Farmer Group 'Model' in Jharkhand State! | अकोल्याच्या शेतकरी गटाचे ‘मॉडेल’ झारखंड राज्यात!

अकोल्याच्या शेतकरी गटाचे ‘मॉडेल’ झारखंड राज्यात!

Next

राजरत्न सिरसाट/अकोला

राज्यातील अकोला आणि लातूर जिल्हय़ातील शेतकरी बचत गटाचे ह्यमॉडेलह्ण झारखंड राज्यात राबविण्यात येणार आहे. नेदरलँडच्या इनोव्हेटीव चेंज कोलॅबरेशन (इको) या संस्थेने झारखंड राज्य शासनाला याबाबत सल्ला दिला असून, झारखंड राज्य शासनाने त्यांच्या ग्रामीण विकास संस्थेची एक तज्ज्ञ चमू पाठवून या जिल्हय़ातील शेतकरी बचत गटाचा अभ्यास केला आहे. महाराष्ट्र राज्य स्पर्धाक्षम प्रकल्प (एमएसीपी) अंतर्गत या जिल्त आतापर्यंत अकराशे बचत गट तयार झाले असून, साडेसातशेच्यावर शेतकर्‍यांचे समूह बचत गट आहेत. या शेतकरी समूह बचत गटांनी १४ ठिकाणी उत्पादक कंपन्या निर्माण केल्या आहेत. या बचत गटांनी नावीन्यपूर्ण पिके घेऊन उत् पादित मालाचे मूल्यवर्धनात रू पांतर केले आहे. अनेक ठिकाणी छोटे प्रक्रिया उद्योग सुरू केले आहे त. एवढेच नव्हे तर गटांच्या वेळेवर मासिक सभा घेण्यात येत आहेत. अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, प्रामुख्याने त्यांच्यामध्ये समन्वय उत्तम आहे. याचीच दखल नेदरलँडच्या इको या संस्थेने घेतली आहे. ही संस्था झारखंडमध्ये कृषी क्षेत्राला अर्थसहाय्य करीत असून, सध्या झार खंड सरकार व इको झारखंडमध्ये कृषी क्षेत्रात काम करीत आहे. या संस्थेने झारखंड शासनाला अकोला व लातूर जिलची नावे दिली.

** जिल्हात नावीण्यपूर्ण शेती

झारखंड राज्य सरकार ग्रामीण विकास संस्थेच्या चमूने गुरुवारी मूर्तिजापूर, आकोट व पातूर येथील शेतकरी समूह गटाचे काम बघितले. या राज्यातील कृषी क्षेत्रातील कामकाजाची साखळी बघून ही चमू प्रभावित झाली असून, विदर्भातील या जिलतील सोयाबीन व इतर खरीप पिके तसेच पीक पद्ध तीत बदल करू न नावीण्यपूर्ण पिकांचे प्रयोग त्यांनी बघितले आहेत.

Web Title: Akola's Farmer Group 'Model' in Jharkhand State!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.