अकोल्याच्या कावड यात्रेत प्रथमच ‘निषेधाची कावड ’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2016 04:54 PM2016-08-29T16:54:08+5:302016-08-29T16:54:08+5:30

देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळवेगळी धार्मिक परंपरा आहे. १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा केवळ धार्मिक उत्सवच नाहीतर तो लोकोत्सव

Akola's Kabad Yatra for the first time, 'Kaavad of prohibition'! | अकोल्याच्या कावड यात्रेत प्रथमच ‘निषेधाची कावड ’ !

अकोल्याच्या कावड यात्रेत प्रथमच ‘निषेधाची कावड ’ !

Next
>ऑनलाइन लोकमत
 
अकोला, दि. 29 -  देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळवेगळी धार्मिक परंपरा आहे. १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा केवळ धार्मिक उत्सवच नाहीतर तो लोकोत्सव झाला आहे. यावर्षी मात्र प्रथमच कावड यात्रेत सहभागी जय बाभळेश्वर मंडळाने पुर्णा नदीचे जल दूषित असल्याने राजेश्वराला अर्पण न करता प्रशासनाचा निषेध केला आहे. 
पूर्णेच्या पात्रातील जल दूषित झाले आहे. या जलाने राजराजेश्वराला जलाभिषेक न करता, पावित्र्य जपावे आणि संबंधित कारखाने मालकावर जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळांच्यावतीने सोमवारी पूर्णेचे दूषित जल १00 भरण्यांमध्ये आणून सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास जय हिंद चौकात भरण्यांमधील दूषित जल ओतून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी जय बाभळेश्वर मंडळाचे शिवभक्त हातात फलक घेऊन निषेध करीत होते. श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांच्या आनंदाला उधाण येतं. ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून ५१ ते ५५१ भरणे, भोपळ्यांची कावड तयार करण्यासाठी आठवडाभर तयारीला लागतात. कावडसोबतच पालखीवर कल्पक आणि आकर्षक देखावे उभारतात. यंदाच्या पालखीमध्ये तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे ५५१ भरण्याची, डाबकी रोडवासी शिवभक्त मंडळाची ४५१ भरण्याची कावड यात्रेकरूंचे आकर्षण होती. विविध शिवभक्त मंडळांनी साकारलेले पालखीवरील आकर्षक देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.

Web Title: Akola's Kabad Yatra for the first time, 'Kaavad of prohibition'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.