दगडाचंही सोनं करणारी अकोल्याची ‘कांचन’!

By admin | Published: October 7, 2016 09:00 AM2016-10-07T09:00:08+5:302016-10-07T09:01:15+5:30

कलेला वय नसतं. अंगी कला असली, की मग ती कला व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. जातिवंत कलाकार कोणत्याही साधनातून मूर्तिमंत कलाशिल्प उभं करतो.

Akola's 'Kanchan', which carries gold! | दगडाचंही सोनं करणारी अकोल्याची ‘कांचन’!

दगडाचंही सोनं करणारी अकोल्याची ‘कांचन’!

Next

- नीलिमा शिंगणे-जगड, ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. ७ -  : कलेला वय नसतं. अंगी कला असली, की मग ती कला व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. जातिवंत कलाकार कोणत्याही साधनातून मूर्तिमंत कलाशिल्प उभं करतो. याचंच उदाहरण अकोल्याच्या कांचन गजानन शेट्ये. त्यांनी साकारलेल्या शिल्पकलांची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली असल्याने ‘कांचन’ यांच्या हातून घडलेल्या दगडांनी त्यांच्या आयुष्याचेही ‘सोनं’ केलं आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील बोरगाव मंजू गावाजवळील छोटेसे कानशिवणी कांचनतार्इंचं गाव. पूर्वाश्रमीच्या कोकिळा गोपाळराव पंत. शेतकऱ्याची लेक असलेल्या कांचनतार्इंना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यावेळी गावात शिक्षणाची सोय नव्हती, तर चित्रकलेचं शिक्षण कोसोदूर होतं. कांचनताई एकलव्याप्रमाणे स्वत:च्या चुकांतून शिकत गेल्या. गुरुस्थानी कोणीही नव्हते; मात्र आई इंदिराबाई पंत कांचनतार्इंच्या प्रत्येक चित्राचे तोंडभरू न कौतुक करीत होत्या; मात्र गावात कोणालाही कांचनताई सुरेख चित्र काढतात, याची कल्पना नव्हती. तुकाराम इंगोले विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कांचनताईचं लग्न त्याचवर्षी गजानन शेट्ये यांच्यासोबत झाला. लग्नानंतर चित्र काढण्यास कांचनतार्इंना वेळच मिळत नव्हता. दहा-बारा वर्षे ही कला घरातील एका कोपऱ्यात गुंडाळून ठेवली होती. पती सरकारी नोकरीत असल्यामुळे बदली झाली त्या गावी जावे लागत होते. घरसंसार सांभाळता पूर्ण दिवस कामातच निघून जात होता. एकही दिवस पेन्टिंगसाठी निवांत मिळत नव्हता. मधातला काळात कांचनतार्इंच्या जीवनात कठीण प्रसंग आले; पण त्यामधून सावरत त्यांनी स्वत:सह कुटुंबातील प्रत्येक सदस्याला धीर देत खंबीरपणे उभ्या राहिल्या. एव्हाना मुलेही मोठी झाली होती. कांचनतार्इंना थोडा वेळ चित्रकलेला देता येऊ लागला.

यानंतर अकोला शहरातील गोरक्षण मार्गावरील पंत मार्केट येथे स्थायिक झाल्यांनतर कांचनतार्इंची कला शेजारची छोटी मुले पाहू लागली. काकू आम्हालाही चित्र काढायला शिकवा, असे मुले म्हणत होती. मुलांना चित्रकला शिकविण्यास कांचनतार्इंनी सुरुवात केली. मुलांच्या चित्रप्रदर्शनही भरवू लागल्या. छंद म्हणून असलेली चित्रकला आज कांचनतार्इंचा व्यवसाय झाला. तुषार पेन्टिंग क्लासेस नावारू पाला आले आहे. त्यांच्या चित्रांनी मोठ्या शहरातील कलादालनात स्थान मिळविले आहे. चित्रांची प्रदर्शनी आणि विक्री दोन्ही करतात. कांचनतार्इंना बालपणापासूनच कलात्मक गोष्टींचा ध्यास आहे. १९९९ पासून त्यांना दगडाला मूर्तरूप देण्याचा छंद लागला. गणपतीसह विविध शिल्पेही त्यांनी दगडांमधून साकारले आहेत. कोणत्याही रस्त्यावर पडलेल्या दगडात कांचनतार्इंना सजीव आकार दिसू लागला. कधी देव, कधी व्यक्ती, कधी प्राणी-पक्षी. सुरुवातीला घरचे लोक हसायचे. दगडासारखा दगड यात कुठे तुला देव दिसतो, मग कांचनतार्इंनी निश्चिय केला. या लोकांना दिसत नाही ना मग आपण रंगवूनच दाखवायचे. मग सर्वांनाच दगडात देव दिसायला लागले. सुरुवातीला रिद्धी-सिद्धीसोबतचा गणपती पार्वतीजवळ बसलेला गणपती, नागाजवळील गणपती, लक्ष्मीजवळील गणपती, पुंगी, तबला व झांज वाजविणारा गणपती असे रंगवत गेले. यानंतर मुले व पतींनी ‘तुला दगडात देव दिसतो, हो आम्हालाही दिसतो आहे’, असे समजुतीने बोलून कलेला प्रोत्साहन दिले; पण त्यांना ते दिसत नव्हते. केवळ समजूत घालण्यासाठी बोलायचे, हे आता मला कळते, असं कांचनताई मिश्कीलपणे सांगतात.

सुरुवातीला १५१ गणपती तयार झाले. याचं २००३ मध्ये प्रदर्शन त्यांनी भरविले. लोकांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. अशातच त्यांच्या मुलांनी सुचविले लिम्का रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवायचे. २५१ विविध अकारांतील गणपती तयार झाल्यानंतर लिम्का रेकॉर्ड बुककरिता नाव नोंदविले. या सर्व प्रक्रियेला दोन वर्षे लागले. २०११ मध्ये लिम्का बुकमध्ये कांचनताईचं नाव नोंदल्या गेले. छोट्या दगडांना मूर्तरू प देणाऱ्या त्या भारतातीलच नव्हे, तर जगातील पहिल्या कलाकार आहेत. २०१४ मध्ये इंडिया बुक रेकॉर्डमध्येही त्यांचे नाव सामील झाले. गिनिज बुकमध्ये नाव नोंदविण्याच्या प्रवासाला कांचनताईचं पाऊल पडलेलं असून, लवकरच गिनिज बुकमध्ये कांचनताईचं नाव नोंदविल्या जाणार असल्याचे संकेत आहेत. बाबासाहेब पुरंदरे, आनंद अभ्यंकर, आशा साठे, मिल्खा सिंग, भरत जाधव व स्वामी अध्वेशानंद या दिग्गजांनी कांचनतार्इंच्या कलेचे कौतुक केले आहे. नागपूर, मुंबई, पुणे, अमळनेर, अकोला व अमरावती येथे वैश्य सोनार संघाकडून सत्कार झाला. राष्ट्रीय महिला मंडळ, लोकमत सखी मंचनेदेखील कांचनतार्इंच्या कलेचा गौरव केला आहे.

Web Title: Akola's 'Kanchan', which carries gold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.