इंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 11:55 AM2020-02-23T11:55:43+5:302020-02-23T12:01:36+5:30
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांना काळं फासण्याचं वक्तव्य केलं होतं.
मुंबई : गर्भलिंगनिदान कसे करावे? याबाबत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे कीर्तनातून भाष्य करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांना काळं फासण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्याविरोधात आज अकोले बंदची हाक देण्यात आली आहे.
गर्भलिंगनिदान कसे करावे? याबाबत इंदोरीकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्याबाबत समर्थक आणि विरोधक यांचे अक्षरशः शाब्दिक युद्ध पेटले आहे. याच विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही कारवाईची मागणी केली होती. तर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसेच इंदोरीकरांना काळं फासण्याचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं होतं.
त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले बंदची हाक देण्यात आली आहे. तर जागो जागी होर्डींग देखील लावण्यात आले आहेत. तसेच, गाड्यांवरही पोस्टर लावण्यात आलं आहेत. यादरम्यान, इंदोरी ते अकोले मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. तसेच, गावात भव्य भजन दिंडी मोर्चा आणि निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.