पेट्रोलपंपावर रक्कम काढण्याच्या सुविधेचा पहिला मान अकोटला
By admin | Published: November 18, 2016 06:57 PM2016-11-18T18:57:00+5:302016-11-18T18:57:00+5:30
देशातील एटीएम आणि बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारनं पेट्रोल पंपांवर ठराविक रक्कम काढण्याची व्यवस्था केली आहे. यांतर्गत देशातील काही
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 18 - देशातील एटीएम आणि बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारनं पेट्रोल पंपांवर ठराविक रक्कम काढण्याची व्यवस्था केली आहे. यांतर्गत देशातील काही ठराविक पेट्रोल पंपावर दोन हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. राज्यात या निर्णयाचा सर्वात पहिल्यांदा अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. अकोट शहरातील अकोला मार्गावरच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावर ग्राहकांना ही सुविधा मिळाली. पहिल्या टप्प्यात अडीच हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा सुरु करण्यात येईल. या निर्णयानं नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदीनंतर बँकांमधील गर्दी दहा दिवसानंतरही कमी होण्याचं नाव घेत नाही. सरकारनं यातून मार्ग काढण्यासाठी आता पेट्रोलपंपांची मदत घेण्याचं ठरवलंय. बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारनं पेट्रोल पंपांवर ठराविक रक्कम काढण्याची व्यवस्था केलीये. यांतर्गत देशातील काही ठराविक पेट्रोल पंपावर दोन हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहेय. सुरुवातीला अडीच हजार पेट्रोल पंपवर ही सुविधा असणार आहे. त्यानंतर जवळपास 20 हजार पेट्रोल पंपावर पैसे काढण्याची सोय करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक आॅफ इंडियानं ही सुविधा सुरु केली आहे. त्याचबरोबर 24 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे एटीएम बाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील. संध्याकाळी अकोला येथील राठी यांच्या पेट्रोलपंपावर सुद्धा ही सुविधा झाली आहे.