दुष्काळग्रस्तांच्या मदतीला अक्षयकुमारही धावला!
By admin | Published: September 16, 2015 01:05 AM2015-09-16T01:05:31+5:302015-09-16T01:05:31+5:30
अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंपाठोपाठ हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अक्षयकुमारही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावला आहे.
बीड : अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंपाठोपाठ हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अक्षयकुमारही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावला आहे. स्वीय सहायकामार्फत अक्षयकुमारने शेतकऱ्यांच्या ३० विधवांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश
पाठवून १५ लाखांची मदत
केली.
जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आयोजित जातीय सलोखा कार्यक्रमात धनादेशाचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी
नवल किशोर राम व विविध
धर्मगुरुंची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
अक्षयकुमार यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहायक वेदांत बाली उपस्थित होते. वर्षभरात बीडमध्ये १९० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी सर्वप्रथम नाना व मकरंद धावून
आले. बीडमध्ये त्यांनी ११२
शेतकरी कुटुंबीयांना मदत केली
होती.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी अक्षयकुमारने संपर्क करुन मदतीची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार नांगरे-पाटील यांनी नियोजन केले. (प्रतिनिधी)