अकोल्यात शिवसेनेची हॅट्ट्रिक !

By admin | Published: December 31, 2015 02:42 AM2015-12-31T02:42:50+5:302015-12-31T02:42:50+5:30

विधान परिषद निवडणूक ; गोपीकिसन बाजोरिया २७४ मतांनी विजयी.

Akthalay's hat-trick of Shiv Sena! | अकोल्यात शिवसेनेची हॅट्ट्रिक !

अकोल्यात शिवसेनेची हॅट्ट्रिक !

Next

अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेने सलग तिसर्‍यांदा बाजी मारली. बुधवारी जाहीर झालेल्या या मतदारसंघाच्या निकालात विद्यमान आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी २७४ मतांची आघाडी घेवून विजयाची ह्यहॅट्ट्रिक ह्ण साधली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र सपकाळ यांच्या दारुण पराभवाने आघाडीला जोरदार धक्का बसला. विधान परिषदेच्या अकोला -बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचे विद्यमान आमदार गोपीकिसन बाजोरिया आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रवींद्र सपकाळ यांच्यात थेट लढत झाली. रविवार, २७ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये तीनही जिल्ह्यातील एकूण ७९१ मतदारांपैकी ७८६ मतदारांनी हक्क बजावला. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या सदस्य मतदारांचा समावेश होता. पाच सदस्यांनी मतदान केले नाही. बुधवारी सकाळी ११ वाजता निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार शिवसेनेचे आ.गोपीकिसन बाजोरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र सपकाळ यांचा पराभव केला. एकूण ७८६ मतांपैकी बाजोरिया यांनी ५१३ मते प्राप्त केली, तर सपकाळ यांना २३९ मते मिळाली. मतमेजणीत २९ मते अवैध ठरली असून, पाच मतदारांनी ह्यनोटाह्णचा वापर केला. अशा प्रकारे एकूण ३४ मते रद्द करण्यात आली. बाजोरिया यांनी सपकाळ यांचा दारुण पराभव करित, २७४ मतांच्या आघाडीने विजय मिळविला. अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग तिसर्‍यांच्या आ.बाजोरिया यांनी विजयाची ह्यहॅट्ट्रिक ह्णसाधली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी काम पाहीले. आ.बाजोरिया यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर सर्मथक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Web Title: Akthalay's hat-trick of Shiv Sena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.