इंद्रायणीच्या रक्षणार्थ आळंदी पालिकेचा उपक्रम ठरला विदायक
By admin | Published: September 19, 2016 05:28 PM2016-09-19T17:28:27+5:302016-09-19T17:28:27+5:30
प्रशासन एखाद्या गोष्टीमागे ठाम पणे उभे राहिल्या नंतर काय घडू शकते याचा प्रत्यय सद्या आळंदीकर ग्रामस्थांना येत आहे.
श्रीकांत बोरावके :
आळंदी, दि. १९ : प्रशासन एखाद्या गोष्टीमागे ठाम पणे उभे राहिल्या नंतर काय घडू शकते याचा प्रत्यय सद्या आळंदीकर ग्रामस्थांना येत आहे.केवळ दुसऱ्यावर बोट उचलत बसण्यापेक्षा आपणही झालेल्या दुरावस्थेस कुठेतरी जबाबदार आहोत आणि ती दुरावस्था दूर करण्यासाठी आपलंही कार्य विदायक हवे या विचाराने प्रेरित होत येथील नगर परिषद प्रशासनाने यंदा इंद्रायणीत मूर्ती विसर्जित न करू देता नदीचे होणारे प्रदूषण रोखण्याचा उपक्रम आखला.इंद्रायणी प्रदूषित होण्यामागे पिंपरी चिंचवड महानगर पालिकाच जबादार आहे व त्याबाबत ठोस भूमिका घेणाऱ्या आळंदी पालिकेने आपल्या भागात होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालायचा असा चंगच बांधला आणि त्याचा श्री गणेशा साक्षात गणरायाच्या मूर्ती इंद्रायणीचीच्या पाण्यात विघटीत होऊ न देण्यापासूनच केला.त्याचा हा उपक्रम विदायक ठरत असून क वर्ग दर्जातील पालिकांमध्ये उल्लेखनीय ठरत आहे.याचे सर्वस्वी श्रेय अवघ्या सहा महिन्यांपासून येथील मुख्याधिकारी पदावर रुजू झालेलं डॉ.संतोष टेंगले,नगराध्यक्ष रोहिदास तापकीर व इतर लोकप्रतिनिधींचे आहे.
पालिकेने यंदा पर्यावरण पूरक गणेशोत्सव राबविण्याचे आवाहन केले होते.इंद्रायणी नदी काठी कृत्रीम तलाव ही उभारण्यात आला होता.परंतु तलाव व हौद उभारत हात वर करून आपली नैतिक जबादारी न झटकता तो उपक्रम प्रभावी पणे राबविण्यात पालिकेने कार्य खरे कौतुकास्पद आहे.इंद्रायणी नदी घाटावर दगडी बांधकाम आहे.अंदाजे चारशे पाचशे मीटरचा हा घाट आहे.येथील परिसरातील सार्वधिक मुर्त्या याच घाट परिसरात विसर्जित केल्या जातात पालिकेच्या वतीने येथे विसर्जनाच्या वेळी स्वंयसेवक नेमण्यात आले होते.हे स्वंयसेवक भाविकांना मूर्ती तलावात विसर्जित करण्याचे आवाहन करत होते.परंतु काही भाविक त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता मूर्ती नदीत विसर्जित करत होते.
भाविकांनी मूर्ती विसर्जित केल्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी स्वंयसेवक स्वतः पाण्यात उतरून ती मूर्ती पाण्यातून बाहेर काढत होते.यामुळे भाविकांची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची श्रद्धाही जपली जात होती व संयसेवका मार्फत नदीचे पावित्र्य.इंद्रायणी नदी घाटाच्या दोन्ही बाजूस शंभरच्या आसपास स्वंसेवक नेमण्यात आले होते.यात पालिकेचे कर्मचारी,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व माईस एमआयटीचे विद्यार्थी,पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते,आळंदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व इतर सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
या मोहिमेत सहभागी झालेल्या पोलीस मित्र व विद्यार्थ्यांना पांडुरंग वाहिले यांच्याकडून पांढऱ्या रंगाचे टीशर्ट उपलब्ध करून देण्यात आले होते.त्यामुळे या पांढऱ्या रंगाच्या पोषाखात या मोहिमेला शिस्तबद्धता आली होती.या सर्वांमार्फत सातव्या व अकराव्या दिवशी मूर्ती पाण्याबाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत आठ ते नऊ हजार मुर्त्या पाण्याबाहेर काढण्यात आल्या.या सर्व मुर्त्या आपल्या ताब्यात घेत पालिकेने त्यांचे कृत्रिम विघटन केले.त्यांचा हा उपक्रम प्रभावी ठरला असून यंदाच्या गणेशोत्सवात इंद्रायणीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात आळा घालत यश आले आहे.केवळ हौदच नव्हे तर थेट नदीतूनही विसर्जीत पाण्याबाहेर काढत पालिकेने पर्यावरण पूरक विसर्जनाची मोहीम यशस्वी करून दाखविली आहे.
तुम्ही तुमची श्रद्धा जपा आम्ही आमच कर्तव्य जपतो
विसर्जनाच्या वेळी स्वंयसेवक नेमण्यात आले होते.हे स्वंयसेवक भाविकांना मूर्ती तलावात विसर्जित करण्याचे आवाहन करत होते.परंतु काही भाविक त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद न देता मूर्ती नदीत विसर्जित करत होते.भाविकांनी मूर्ती विसर्जित केल्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी स्वंयसेवक स्वतः पाण्यात उतरून ती मूर्ती पाण्यातून बाहेर काढत होते.यामुळे भाविकांची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याची श्रद्धाही जपली जात होती व संयसेवका मार्फत नदीचे पावित्र्य.