शराब मिलेगी अब शिशे में!
By admin | Published: January 12, 2016 02:47 AM2016-01-12T02:47:55+5:302016-01-12T02:47:55+5:30
देशी आणि विदेशी दारूच्या आवेष्टनासाठी केवळ काचेचाच वापर करावा, असा आदेश गृह विभागाने आज काढला. तसेच या बाटलीवर ‘फॉर सेल इन महाराष्ट्र स्टेट ओन्ली’ किंवा ‘फक्त महाराष्ट्र राज्यात
मुंबई : देशी आणि विदेशी दारूच्या आवेष्टनासाठी केवळ काचेचाच वापर करावा, असा आदेश गृह विभागाने आज काढला. तसेच या बाटलीवर ‘फॉर सेल इन महाराष्ट्र स्टेट ओन्ली’ किंवा ‘फक्त महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता’ असा उल्लेख करणे बंधनकारक असेल. या आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१६पासून करण्यात येणार आहे.
प्लास्टीक बाटल्यांसाठी वापरण्यात येणारा पदार्थ हा पर्यावरणासाठी घातक आहे. कारण या बाटल्या अविघटनशील असल्याने पर्यावरणाची हानी होण्याची भीती असते. या बाटल्यांची विल्हेवाट सहजासहजी लावता येत नाही. त्या गटारे-नाले, मलनि:सारणाच्या अन्य ठिकाणी पडून राहिल्याने सार्वजनिक स्वच्छता आणि प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. प्लास्टीक हे काही प्रमाणात अल्कोहलमध्ये विद्राव्य होत असल्याने मानवी आरोग्यास धोका संभवतो. म्हणून दारू या बाटल्यांमधून न देण्याची मागणी काही संघटनांकडून शासनाकडे सातत्याने करण्यात येत होती.
प्लास्टीकच्या बाटल्या वजनास हलक्या असल्याने त्यांची चोरटी वाहतूक करणे सोपे जाते. त्यामुळे शासनाला महसुलास मुकावे लागते. प्लास्टीक बाटल्यांमुळे आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने संभवणारा धोका आणि तस्करी सोपी झाल्याने या बाटल्यांमध्ये दारू बाजारात आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)
टेट्रा पॅकला मनाई
या आदेशानुसार देशी,
विदेशी मद्य, बीअर, वाईन हे पेट वा टेट्रा पॅकमध्ये (प्लास्टीक) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
बीअरसाठी कॅनचा वापर करण्यास निर्बंध नसतील. स्पिरिटसाठी काचेच्या नवीन बाटल्याच वापरता येतील.