मद्यपी चालकांना दोन तासात बडतर्फ करणार : दिवाकर रावते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:24 PM2019-07-26T19:24:25+5:302019-07-26T19:31:09+5:30

पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर एसटी चालकाने मद्यपान करून बेकायदेशीररित्या शिवशाही बसचा ताबा घेऊन, बेदरकारपणे बस चालवून अपघात घडवला.

The alcoholic driver will suspend in two hours : Divakar Raote | मद्यपी चालकांना दोन तासात बडतर्फ करणार : दिवाकर रावते

मद्यपी चालकांना दोन तासात बडतर्फ करणार : दिवाकर रावते

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजीनगर येथील घटनेचे पडसाद

पुणे : मद्यधुंद अवस्थेमध्ये बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकांना यापुढे सेवेतून तातडीने बडतर्फ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. शिवाजीनगर येथे मंगळावारी (दि. २३) रात्री घडलेल्या प्रकारानंतर महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. या घटनेतील चालकाचीही सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवाजीनगर बसस्थानकातील घटनेप्रमाणे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यास आपल्या नोकरीला कायमचे मुकावे लागेल, अशा कडक नियमावली प्रशासनाने राबवावी, असे निर्देश श्री. रावते यांनी प्रशासनाला दिले आहेत.  जेणेकरून भविष्यात मद्यपान करून गैरवर्तन करणार्यांना कायमचा आळा बसेल. 
     काल दि. २५ जुलै रोजी पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर अमोल चोले या एसटी चालकाने मद्यपान करून बेकायदेशीररित्या एसटीच्या शिवशाही बसचा ताबा घेऊन, बेदरकारपणे बस चालवून अपघात घडवला. संबंधित बसच्या वाहकाच्या व प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने अप्रिय प्रसंग टळला. परंतु, सदर घटनेची गांभीयार्ने दखल घेऊन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पुण्याचे विभाग नियंत्रकांनी सदर चालकाला एसटीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात येत असल्याची सूचना निर्गमित केली  आहे. 
     प्रवासी हे दैवत समजून त्यांना सेवा देणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवासामध्ये त्यांना सुरक्षित व सौजन्यशील सेवा देण्याचे व्रत अंगिकारले पाहिजे, जेणेकरून एसटीवरचा प्रवाश्यांच्या अढळ विश्वासाला कोठेही तढा जाणार नाही. उपरोक्त प्रसंगासारख्या गैर कृत्यामुळे एसटीची प्रतिमा मालिन होणार नाही याची काळजी एसटीच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन श्री. रावते यांनी याप्रसंगी केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, एसटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकावर कडक कारवाई करून  ज्यापद्धतीने त्यांच्या बेकायदेशीर रिक्षा परिवहन विभागाने तोडून टाकुन, निर्भयपणे काम करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्याला धीर दिला. त्याचप्रमांणे या कारवाईतून, बेशिस्त वर्तन करून प्रवाशांच्या  जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार एसटी कर्मचाऱ्यांना देखील एसटीच्या सेवेतून बडतर्फ करून प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्दिष्टाला एसटी कडून कधीही  गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाणे अपेक्षित आहे. 
  -----------------------

Web Title: The alcoholic driver will suspend in two hours : Divakar Raote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.