मद्यपी तरुणांनी वाहतूक पोलिसाला उडविले
By admin | Published: June 9, 2017 05:15 AM2017-06-09T05:15:28+5:302017-06-09T05:15:28+5:30
मद्यपी मोटारसायकलस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलिसाला धडक देत शिवीगाळ करण्याची घटना दादर मच्छी मार्केटसमोर बुधवारी रात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ची मोहीम सुरू असताना मद्यपी मोटारसायकलस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलिसाला धडक देत शिवीगाळ करण्याची घटना दादर मच्छी मार्केटसमोर बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी साईनाथ दत्तात्रय पाटील (वय २२) व किरण धनाजी निपाणे (१९, दोघे रा. प्रभादेवी) यांना अटक करण्यात आली आहे.
तरुणांच्या धडकेत सहायक फौजदार विलास यशवंत शेडगे (वय ५६, रा. वरळी बीडीडी चाळ) गंभीर जखमी झाले आहेत. शेडगे हे दादर वाहतूक चौकीत कार्यरत असून, नाकाबंदी असल्याने ते दादरमधील सेनापती बापट मार्गासमोर सहकाऱ्यांसह ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ची कारवाई करीत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांनी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटारसायकलस्वार साईनाथने त्यांच्या अंगावर गाडी घातली तर किरणने शिवीगाळ करीत वाद घातला होता.