अलर्ट! महाराष्ट्रात पुन्हा घातपाताची शक्यता?; श्रीवर्धनमध्ये बोटीत AK-४७ आढळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:32 PM2022-08-18T14:32:21+5:302022-08-18T17:43:22+5:30

महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून राज्याच्या सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ दखल घ्यायला हवी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

Alert! Suspicious boat on the beach or Harihareshwar, Information about weapon found in boat, AK-47 found in boat in Shrivardhan | अलर्ट! महाराष्ट्रात पुन्हा घातपाताची शक्यता?; श्रीवर्धनमध्ये बोटीत AK-४७ आढळल्या

अलर्ट! महाराष्ट्रात पुन्हा घातपाताची शक्यता?; श्रीवर्धनमध्ये बोटीत AK-४७ आढळल्या

Next

रायगड - मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला कुणीही विसरू शकत नाही. या हल्ल्यात अनेक निष्पाप मुंबईकरांचे जीव गेले. समुद्रामार्गे बोटीतून १० पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत घुसले त्यानंतर त्यांनी शहरात रक्तपात घडवला. आता रायगडच्या श्रीवर्धन हरिहरेश्वर समुद्रकिनारी २ निनावी बोट आढळली असून त्या बोटीत ३ एके-४७ आढळल्यानं खळबळ माजली आहे. 

याबाबत जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर म्हणाले की, श्रीवर्धन समुद्रकिनारी २ संशयास्पद बोटी आढळल्या आहेत. या बोटींमध्ये ३ एके ४७ आणि २२५ राऊंड्स, कॉन्फरन्स टेबल, कॅम्प्युटर आढळले आहेत. काही ग्रामस्थांनी बोट काढण्याचा प्रयत्न केला. काही एके-४७ बंदुका आढळून आल्या आहेत. नेपच्युन सिक्युरिटी मेरेटाइन असं बोटीवर लोगो आहे. पोलीस तपास करत आहेत. संबंधित कंपनीची ही स्पीड बोट असावी अशी शक्यता आहे.त्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयास्पद गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. 

विधान परिषदेत आमदार अनिकेत तटकरे यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. अनिल तटकरे म्हणाले की, रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी एके ४७, काडतूस सापडली आहे. राज्याच्या दृष्टीने संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव आहे. दिवेआगारात लाईफ बोट सापडली आहे. पुन्हा २६/११ ची पुनरावृत्ती होतेय का? अशी भीती वाटत आहे. राज्यात दहशतवादी घुसलेत का? याबाबत सरकारने निवेदन सादर करावे अशी मागणी त्यांनी सभागृहात मांडली. तर विधानसभेत माजी मंत्री आदिती तटकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. 

महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून राज्याच्या सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ दखल घ्यायला हवी. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. संशयित कागदपत्रे सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्य सरकारने यावर त्वरीत टीम नेमून स्थानिक, राज्यातील लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात असं आदिती तटकरे यांनी सांगितले. 

१९९३ ची पुनरावृत्ती?
फेब्रुवारी, १९९३ मध्ये रायगड जिल्ह्यात दिघी व शेखाडी बंदरात एके ५६ बंदुका व आरडीएक्सचे साठे उतरविण्यात आले. त्यानंतर १२ मार्च, १९९३ रोजी मुंबईतील शेअर बाजार, एअर इंडिया इमारत, सेंचुरी बाजार, प्लाझा सिनेमा, नायगाव, विमानतळ प्रवेशद्वार आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. त्यात २५७ जण ठार झाले होते. 

Web Title: Alert! Suspicious boat on the beach or Harihareshwar, Information about weapon found in boat, AK-47 found in boat in Shrivardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.