अलीबाबा अन् चाळीस चोर एकत्र; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 07:40 AM2023-05-27T07:40:25+5:302023-05-27T07:41:30+5:30

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष विरोध करीत आहेत. परंतु, विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदींना काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.

Alibaba and forty thieves together; Devendra Fadnavis, Eknath Shinde allegations on opposition parties | अलीबाबा अन् चाळीस चोर एकत्र; देवेंद्र फडणवीसांचा टोला

अलीबाबा अन् चाळीस चोर एकत्र; देवेंद्र फडणवीसांचा टोला

googlenewsNext

अहमदनगर/कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैश्विक नेतृत्व असून, त्यांना हटविण्यासाठी अलीबाबा आणि चाळीस चोर एकत्र येत आहेत, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सर्वपक्षीय आघाडीवर केली. ते म्हणाले, त्यांनी हा प्रयोग २०१९ मध्येही केला होता. परंतु, त्याचा  परिणाम झाला नाही. कारण त्यांच्याकडे एकही राष्ट्रीय नेता नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष विरोध करीत आहेत. परंतु, विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदींना काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशातच नव्हे, तर परदेशातही वाढली आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

‘शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मराठवाड्यातील सुरुवात कन्नड येथून शुक्रवारी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. 
आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावे लागत होते; मात्र शासनाकडे मोठी यंत्रणा असताना आपणही जनतेच्या दारी का जाऊ शकत नाही, असा विचार करून ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

...म्हणून मी राजकारणात आलाे!  
माझ्यातील नेतृत्वगुणांचा विकास विद्यार्थी परिषदेतच झाला. मला राजकारणात यायचेच नव्हते; पण संघटनेत होणारा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे मला सांगितले गेल्यानंतर मी राजकारणात आलो, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Web Title: Alibaba and forty thieves together; Devendra Fadnavis, Eknath Shinde allegations on opposition parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.