"कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जावा, मग तो कुठल्याही धर्माचा असो"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 09:54 PM2020-03-30T21:54:21+5:302020-03-30T23:22:38+5:30

असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी मृतदेह जाळणे हाच योग्य पर्याय आहे.

All bodies of COVID19 patients should be cremated says Praveen Pardeshi Commissioner of BMC sna | "कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जावा, मग तो कुठल्याही धर्माचा असो"

"कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जावा, मग तो कुठल्याही धर्माचा असो"

Next
ठळक मुद्देअंत्य संस्‍कारावेळी केवळ पाच लोकांनाच उपस्थित राहता येईलअंत्य संस्कार करणाऱ्या व्यक्तींनीही योग्य प्रकारे काळजी घ्यावी - WHO असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते

मुंबई - कोराना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जायला हवा, मग तो कुण्याही धर्माचा असो. तो दफन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच अंत्य संस्‍कारावेळी केवळ पाच लोकांनाच उपस्थित राहता येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त प्रवीण परदेशी यांनी म्हटले आहे.

असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी मृतदेह जाळणे हाच योग्य पर्याय आहे. यासंदर्भात जागतीक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) काही नियम ठरवून दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त परदेशी यांनी म्हटले आहे, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर धर्माचा विचार न करता अंत्यसंस्कार करायला हवेत. त्यांना जफन करण्याची परवानगी नसेल तर ते जाळण्यात येतील. एवढेच नाही, तर अंत्यसंस्कारावेळीही 5 हून अधिक लोक नसावेत. लक्षात असू द्या, की अंत्यसंस्कारासारख्या सामाजिक कार्याची जबाबदारीही नगरपालिकेलाच पार पाडावी लागते. 

जागतीक आरोग्य संघटनेकडूनही (डब्ल्यूएचओ), मृतदेह आयसोलेशन रूम अथवा कुठल्याही ठिकाणावरून हलवताना आपण मृतदेहाच्या फ्लूइड्सच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक सुरक्षा उपकरणांचा योग्य प्रकारे वापर करावा. तसेच अंत्य संस्कार करणाऱ्या व्यक्तींनीही योग्य प्रकारे काळजी घ्यावी,असा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: All bodies of COVID19 patients should be cremated says Praveen Pardeshi Commissioner of BMC sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.