संपुर्ण तुर खरेदी होईपर्यंत नाफेडची सर्व केंद्रे सुरू राहातील : सुभाष देशमुख

By admin | Published: March 27, 2017 03:52 PM2017-03-27T15:52:37+5:302017-03-27T15:52:37+5:30

संपुर्ण तुर खरेदी होईपर्यंत नाफेडची सर्व केंद्रे सुरू राहातील : सुभाष देशमुख

All the centers of NAFED will continue till full purchase: Subhash Deshmukh | संपुर्ण तुर खरेदी होईपर्यंत नाफेडची सर्व केंद्रे सुरू राहातील : सुभाष देशमुख

संपुर्ण तुर खरेदी होईपर्यंत नाफेडची सर्व केंद्रे सुरू राहातील : सुभाष देशमुख

Next

संपुर्ण तुर खरेदी होईपर्यंत नाफेडची सर्व केंद्रे सुरू राहातील : सुभाष देशमुख
सोलापूर : राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांची तुर विक्री होणे अजून बाकी आहे. त्यामुळे केंद्र शासनाने राज्यातील नाफेडची सर्व तूर खरेदी केंद्र सुरू ठेवावीत अशी मागणी पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेवून केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी कोणतेही तुर खरेदी केंद्र बंद करण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात नाफेडच्या वतीने ११८ तुर खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यातील ५८ तुरू खरेदी केंद्र बंद करण्यासंदर्भात नाफेडकडून २१ मार्च २०१७ रोजी मार्केटिक फेडरेशन ला कळविण्यात आले होते. यासंदर्भात पणन मंत्री देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांना नाफेड तूर खरेदी केंद्रे बंद करू नयेत असा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवून विनंती केली होती.
राज्यात चांगला पाऊस झाल्याने तुरीचे यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शासनाने ५०५० रुपए हमी भाव दिला आहे. आतापर्यंत सर्वाधिक २८ लाख क्विंटल तूर खेरदी झाली आहे. १५ एप्रिल २०१७ पर्यंत अजून जवळपास १० लाख क्विटल खरेदी होईल असा अंदाज आहे. त्यासाठी राज्यात ३१७ तूर खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यात ११८ तूर खरेदी केंद्र ही नाफेडची आहेत. ही खरेदी केंद्र शेतकऱ्यांची सर्व तुर खरेदी होईपर्यंत सुरू राहणार आहेत.

Web Title: All the centers of NAFED will continue till full purchase: Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.