दिवसभर राबायचे अन् रात्री पाण्यासाठी जागायचे !

By admin | Published: April 18, 2016 02:56 AM2016-04-18T02:56:56+5:302016-04-18T02:56:56+5:30

दिवसभर पोटासाठी राबराब राबायचे अन् रात्री हंडाभर पाण्यासाठी जागायचे, असा नित्यनियम आष्टी तालुक्यातील जोमदार तांडा येथे दोन महिन्यांपासून सुरू आहे. गावात एकही हातपंप सुरू

All day long and you want to drink water! | दिवसभर राबायचे अन् रात्री पाण्यासाठी जागायचे !

दिवसभर राबायचे अन् रात्री पाण्यासाठी जागायचे !

Next

- व्यंकटेश वैष्णव,  बीड
दिवसभर पोटासाठी राबराब राबायचे अन् रात्री हंडाभर पाण्यासाठी जागायचे, असा नित्यनियम आष्टी तालुक्यातील जोमदार तांडा येथे दोन महिन्यांपासून सुरू आहे. गावात एकही हातपंप सुरू नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आष्टी शहरापासून तब्बल ६५ किलोमीटरवरील जोमदार तांडा येथील लोकसंख्या ५००च्या घरात आहे. मजुरी वगळता येथे कुठलेच उदरनिर्वाहाचे साधन नाही. दिवस उगवताच हातात खोरे-टिकाव घेऊन लोक दीड-दोन किलोमीटरवरील रोहयो अथवा इतर मिळेल त्या ठिकाणी कामावर जातात. सायंकाळी घरी आल्यावर जेवण होते न होते, तोच वेध लागतात पिण्याचे पाणी भरण्याचे. कधी टँकर येतो, तर कधी नाही. या तांड्यावर दोन-तीन दिवसांतून एक टँकर येते आणि तोसुद्धा रात्रीच्या वेळी. वेळ ठरलेली नसल्याने, रात्रभर टँकरची वाट पाहावी लागते.
‘सतत विद्युतपुरवठा खंडित असल्यामुळे दिवसा टँकर भरले जात नाहीत. सायंकाळी वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर १२ हजार लीटरचे टँकर भरण्याचे काम सुरू होते. ३० ते ४५ किलोमीटरवरून पाणी आणले जात असल्याने, आजूबाजूच्या गावांमध्ये रात्री १ नंतरच टँकर येतो. टँकरचा हॉर्न वाजताच गावातील लहान-थोरांचा त्याला गराडा पडतो,’ अशी व्यथा तुकाराम राठोड यांनी मांडली.
दिवसभर काबाडकष्ट करून दमलेल्या लोकांना रात्री-अपरात्री पाणी भरण्यासाठी उठावे लागते. घरातील मुलांना टँकरवर पाइप टाकण्याचे काम असते. टँकर ज्या रस्त्याने येतो, त्या रस्त्यावरच लोक ठिय्या मारून बसतात.
बीड जिल्ह्यात ८१० टँकरने पाणी पुरविले जात आहे. त्यात आष्टी तालुक्यात १३३ टँकरद्वारे ११९ वाड्या व ९१ गावांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले.

गावात एकही हातपंप सुरू नाही. दोन दिवसांनी टँकर येतो, तोसुद्धा रात्री. पिण्याचे पाणी भरण्यासाठी सर्व गावच रात्रभर जागे असते. असे जोमदार तांड्याचे किसनराव राठोड यांनी मराठवाड्यातीस कष्टकरी जनतेच्या व्यथा मांडल्या.

Web Title: All day long and you want to drink water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.